AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudi Padwa 2026: शोभायात्रा, सण अन् गावची जत्रा, गुढी पाडव्यानिमित्त कलाकारांचे खास प्लॅन

जसे हे कलाकार आपल्या खासगी आयुष्यात गुढी पाडवा साजरा करतात, तसेच झी मराठीवरील लक्ष्मी निवास, कमळी, वीण दोघातली ही तुटेना, शुभ श्रावणी आणि तुला जपणार आहे, या मालिकांमध्येही गुडीपाडव्याचा उत्साह बघायला मिळणार आहे.

| Updated on: Mar 19, 2026 | 10:40 AM
Share
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आणि शोभायात्रांमध्ये सहभागी होत आनंद साजरा केला जातो. झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या कलाकारांनीही खास पद्धतीने हा सण साजरा केला आहे.

1 / 6
"गुढी पाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही एक संधी असते आणि नववर्ष त्यांच्यासोबत साजरे करण्याचा अनुभव खूप सुखद असतो. शोभायात्रे मधला लोकांचा उत्साह पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. मी ही छान पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत जाणार आहे. माझ्या घरीही तितक्याच उत्साहाने गुढी पाडवा साजरा केला जातो. आम्ही एकत्र गुढी उभारतो आणि आई मस्त बासुंदी पुरीच जेवण बनवते," असं शुभ श्रावणी मालिकेत श्रावणीची भूमिका साकारणारी वल्लरी विराज म्हणाली.

2 / 6
"यावर्षी मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहे आणि नंतर दरवर्षीप्रमाणे मी गावी जाणार आहे. गुढी पाडव्याच्या नंतर जो शनिवार येतो, त्या दिवशी आमच्या गावात ग्रामदेवता जानुबाईची जत्रा असते, त्यासाठी आम्ही सर्व जातो. यावर्षी एक खास गोष्ट म्हणजे, मागच्या वर्षी जत्रेसाठी गावी गेले असताना, ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी मला ‘कमळी’साठी कॉल आला होता. तेव्हा मी मनात इच्छा व्यक्त केली होती की हे काम मिळावे, आणि ते झाले म्हणून यावेळी आभार मानणार आहे. आमच्याकडे आजी गुढी उभारायची. मी सातारची असल्यामुळे घरी पुरणपोळी, गुळवणी आणि कटाची आमटी असतेच. मला ढोल-ताशा पथक खूप आवडते, शोभायात्रेबद्दल खूप उत्सुक आहे", असं कमळी मालिकेत कमळीची भूमिका साकारणारी विजया बाबरने सांगितलं.

3 / 6
"मी दरवर्षी घरीच गुढी पाडवा साजरा करत होते, पण यावर्षी मी झी मराठी आणि ‘सनई चौघडे’च्या कुटुंबासोबत हा सण साजरा करणार आहे. आम्ही सर्व एकत्र डोंबिवली शोभायात्रेत सहभागी होणार आहोत. आमची मालिका गुढी पाडव्याच्या आठवड्यात सुरू झाली आहे, त्यामुळे प्रेक्षकांसोबत हे नवीन वर्ष साजरे करण्याचा उत्साह दुप्पट आहे. आमच्या घरी मी आणि माझ्या सासूबाई पहाटे उठून गुढी उभारतो. आमच्याकडे बायकांचेच राज्य असल्यामुळे गुढीसाठी कोणता शेंडा आणि कोणती साडी लावायची हे आम्ही ठरवतो", असं सांगत सनई चौघडे मालिकेत पमा परबची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडेनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 6
"सर्वांना माझ्याकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षीपासून आम्ही घरी गुढी उभारणार आहोत. मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेत जाते आणि मला ती खूप आवडते, कारण तिथे आपली माणसं एकत्र आली आहेत असे वाटते.  गुढी पाडवा म्हटलं की गोड जेवण असायलाच पाहिजे, गुळपोळी, श्रीखंड-पूरी, बटाट्याची भाजी, वरण-भात, भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं असा एक छान बेत असतो. दरवर्षी मी देवळात जाऊन बाप्पाचा आशीर्वादही घेते", असं सनई चौघडे मालिकेत आसावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितलं.

5 / 6
‘तुला जपणार आहे’ मालिकेत मीरा आणि अथर्व आपल्या संपूर्ण परिवारासोबत गुढी उभारणार आहेत. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत समर–स्वानंदी आणि रोहन–अधिराचा आणि लक्ष्मी निवास मालिकेत सिद्धू आणि भावनाचा हा पहिला गुढी पाडवा असून तोही खास असणार आहे.

6 / 6
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं