AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi: पीएम मोदींनी नवरात्री,गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांदच्या दिल्या शुभेच्छा

PM Narendra Modi Greetings: संपूर्ण देशात नवरात्री,गुढीपाडवा, उगादी आणि चेती चंदचा उत्साह शिगेला आहे. सर्वदूर सणासुदीची धामधूम आहे. देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध राज्यातील या सणांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi: पीएम मोदींनी नवरात्री,गुढीपाडवा, उगादी आणि चेती चांदच्या दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 19, 2026 | 10:59 AM
Share

PM Narendra Modi Greetings: देशभरात नवरात्री, गुढीपाडवा, उगादी आणि चेती चंदचा उत्साह ओसांडून वाहत आहे. विविध राज्यातील निसर्गाशी जोडलेले हे सण जगण्याची उर्मी देतात. देशभरात या सणाची धामधूम आहे. या पावन पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या सणानिमित्त शिस्त, शांती आणि सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहो अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X एक्सवर त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

नवरात्रीच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची पूजा केली. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, माता दुर्गेचे पहिल्या रुपाचे, शैलपुत्री देवीची पूजा करण्यात येते. तिच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीनात शिस्त, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येवो.”अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या. इच्छापूर्ती करणाऱ्या मातेसमोर मी नतमस्तक होतो. मातेच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे. ती बैलावर आरूढ आहे. तिच्या हाती त्रिशूल आहे. कोट्यवधी भारतीयांच्या वतीने मी विश्वमाता, माता दुर्गेच्या चरणी नतमस्तक होतो. नवरात्रीच्या या पवित्र आणि मंगलप्रसंगी, मी आदिशक्तीला प्रार्थना करतो की मातेने सर्वांवर प्रेम आणि करुणेचा वर्षाव करावा. जय माता दी! असे मोदींनी ट्विट केले आहे.

गुढी पाडव्याच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षाच्या सुरूवातीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. गुढी हे जैत आणि समृद्धी आशाचे प्रतिक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा सण नवीन ऊर्जा, आसा आणि नवीन संधीचा संदेश घेऊन येतो. येणारे नवीन वर्ष सर्वांना आनंद, यश आणि उत्तम आरोग्य लाभो असा शुभ संदेश त्यांनी दिला.

चेती चांद सणाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेती चांद सणाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांसाठी हा सण सुख, समृद्धी आणि समाधानाचा जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. चेटी चांद हा सिंधी समाजाचा एक प्रमुख सण असून, तो त्यांचे नववर्ष म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भगवान झुलेलाल यांची जयंती देखील असते, ज्यांना भगवान वरुण यांचा अवतार मानले जाते.चेती चांदनिमित्त पीएम मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

उगाडी सणानिमित्त मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी उगादी आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. त्यांनी उगादीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हे सण हिंदू नववर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहेत आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जातात. पंतप्रधान मोदींचा संदेश आणि भक्तांच्या भक्तीने उत्सवाचे पवित्र वातावरण अधिकच वाढवले ​​आहे. या निमित्ताने देवी दुर्गाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विशेष प्रार्थना आणि पूजा करत आहेत.

प्रत्येक राज्याच्या भाषेत शुभेच्छा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढी पाडवा, उगादी, चेती चांद, नवरेह आणि साजिबू चेइराओबा या सणानिमित्त त्या त्या राज्याच्या भाषेत शुभेच्छा दिल्या. त्यांनी गुढीपाडव्याच्या महाराष्ट्रातील जनतेला, उगादी सणानिमित्त आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील नागरिकांना, चेती चांद निमित्त सिंधी समाजाला, नवरेह निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना, तर साजिबू चेइराओबा या मणिपूरच्या पारंपारिक सणानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक्सवर याविषयीच्या विविध पोस्ट शेअर केल्या आहेत.

“गुड़ी पड़वा की हार्दिक शुभकामनाएं!”

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“गुडी पाडव्याचीं परबीं”

“आपका उगादी मंगलमय हो!”

“ನಿಮ್ಮ ಯುಗಾದಿ ಸಡಗರದಿಂದ ಕೂಡಿರಲಿ! ”

“ఉగాది పండుగను ఆనందంగా జరుపుకోండి!”

“चेती चांद की हार्दिक शुभकामनाएं! आपके लिए यह वर्ष बहुत ही शुभ हो, ऐसी कामना करता हूं।”

“नवरेह पोश्ते! आने वाला वर्ष आपके लिए बहुत अच्छा हो।”

“साजिबू चेइराओबा की शुभकामनाएं। सभी के लिए एक शानदार वर्ष की कामना करता हूं।”

अशा विविध भाषेत त्यांनी स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी