‘शाळा’ फेम अभिनेत्याने लग्नासाठी निवडली पुण्यातील ‘ही’ खास जागा; तुम्हीही पडाल प्रेमात!

'शाळा' फेम अभिनेते अंशुमन जोशी आणि 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे यांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. हा लग्नसोहळा पुण्यातील एका खास ठिकाणी पार पडला.

| Updated on: Mar 16, 2026 | 10:34 AM
1 / 6
'शाळा' या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशी नुकताच लग्नबंधनात अडकला. आई कुठे काय करते या मालिकेत ईशाची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेशी त्याने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 6
अंशुमन आणि अपूर्वाने त्यांच्या लग्नासाठी अत्यंत खास जागा निवडली होती. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय इथं या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या विवाहस्थळाचे सुंदर फोटो  आता दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 6
झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय हे पुणे शहराजवळ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पुढे कुडजे स्थित संग्रहालय आहे. आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांच्या झपूर्झा या कवितेच्या नावावरून संग्रहालयाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

4 / 6
ही खास जागा अंशुमन आणि अपूर्वाने त्यांच्या लग्नासाठी निवडली होती. इथं लग्नसाठी सुंदर देखाव्यासमोर मंडप बांधण्यात आला आणि फुलांची सुरेख सजावट करण्यात आली होती.

5 / 6
झपूर्झा संग्रहालय इथं विविध विषयांशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. चित्रपट, नाट्य, संगीत इत्यादी विषयांचे कार्यक्रम इथे नियमित स्वरूपात होतात. यासाठी इथं 200 लोकांची आसनक्षमता असलेलं प्रेक्षागृहसुद्धा आहे.

6 / 6
सुमारे 600 प्रेक्षक बसू शकतील असं खुले आंफी थिएटरसुद्धा इथं आहे. हस्तकला, नृत्य, कुंभारकला अशा विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या छोट्या कार्यशाळा इथं होतात.

Follow Us