‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार

| Updated on: May 23, 2021 | 11:20 PM

Roadlark E-bicycle चं कार्गो व्हर्जन बाजारात दाखल झालं आहे. या कार्गो ई-सायकलची किंमत 42,000 रुपयांपासून सुरू होते

या इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार
Cargo E Bicycle
Follow us on

मुंबई : फिटनेसचा विचार करणारे, व्यायाम करणाऱ्यांसाठी Roadlark E-bicycle लाँच करण्यात आली होती. परंतु आता या सायकलचं कार्गो व्हर्जनदेखील बाजारात दाखल झालं आहे. या कार्गो ई-सायकलची किंमत 42,000 रुपयांपासून सुरू होते आणि ती बर्‍याच कस्टमायजेबल पर्यायांसह येते. Nexzu Roadlark cargo ई सायकल 50 किलोग्रामपर्यंतचं वजन उचलू शकते. तसेच ही सायकल ताशी 25 किलोमीटर इतक्या वेगाने धावते. (Nexzu Roadlark Cargo E-bicycle launched, check price and features)

ही एक मेड इन इंडिया ई सायकल असून ती ड्युअल बॅटरीसह येते. याl 8.7Ah लाइटवेट रिमूव्हेबल बॅटरी युनिट आहे तर दुसरी फिक्स्ड बॅटरी आहे, ज्याची क्षमता 5.2Ah आहे. आपण एका वॉल चार्जरसह सहजपणे या बॅटरी चार्ज करु शकतो. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेकसुद्धा दिले आहेत. ही सायकल एकदा फुल चार्ज केल्यानंतर 100 किमीपर्यंत धावते. दरम्यान, जर रायडिंगदरम्यान बॅटरीचं चार्जिंग संपलं तर ती सामान्य सायकलप्रमाणे पॅडलच्या सहाय्याने चालते.

दोन राईड मोड

या सायकलमध्ये तुम्हाला दोन राईड मोड मिळतील, ज्यात Pedlec आणि Throttle चा समावेश आहे. कंपनीची यापूर्वीची सायकल सिंगल चार्जमध्ये 75 किलोमीटरपर्यंतची रेंज देत होती. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांनी भारतात 90+ टचपॉइंट्स स्थापित केले आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या वेबसाइटवरूनही ही सायकल ऑर्डर करता येईल.

डिलीव्हरी पार्टनर्ससाठी उपययुक्त

कंपनीच्या या प्रोडक्टचा वापर डिलीव्हरी पार्टनर म्हणजेच रेस्टॉरेंट, क्लाउड किचन, सुपरमार्केट, रिटेल आऊटलेट, इंडस्ट्रियल पार्क्स, इसेन्शियल सप्लायर आणि इतर कंपन्या करु शकतात. कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांना कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सायकलमुळे जरादेखील प्रदूषण होत नाही.

मजबूत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज

Nexzu Mobility चे सीईओ राहुल शोनाक म्हणाले की, रोडलार्क कार्गो दमदार स्टीलपासून बनवली आहे, जी कितीही खडतर रस्त्यांवरुन टिकाऊ प्रवास करू शकते. ड्युअल डिस्क ब्रेकसारख्या उच्च सुरक्षा फीचर्ससह ही सायकल सुसज्ज आहे. तसेच ही सायकल loT कनेक्टिव्हिटीसारख्या प्रगत फीचर्ससह येते.

संबंधित बातम्या

Tata Nexon EV बनली भारतातली नंबर वन इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

(Nexzu Roadlark Cargo E-bicycle launched, check price and features)