ओलेक्ट्रा ग्रीनटेकची डसॉल्ट सिस्टिम्ससोबत भागीदारी, डिजिटल तंत्रज्ञानातून ई-मोबिलिटीला नवे बळ
Olectra Greentech : भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने डसॉल्ट सिस्टिम्ससोबत भागीदारी केली आहे. याचा कंपनीला मोठा फायदा होणार आहे.

दिल्ली/हैदराबाद, 11 मे : भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आता जागतिक दर्जाच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. कंपनीने डसॉल्ट सिस्टिम्सच्या 3DEXPERIENCE प्लॅटफॉर्म वापर करण्याचे निश्चित केले असून यामुळे इलेक्ट्रिक बस आणि ट्रक तंत्रज्ञान विकास अधिक वेगवान, स्मार्ट आणि जागतिक मानकांनुसार होणार आहे.
या प्लॅटफॉर्ममुळे डिझाईन, उत्पादन, सिम्युलेशन आणि भागीदारांमधील सहकार्य एका डिजिटल छताखाली येणार आहे. यामुळे वाहनांची रचना व्हर्च्युअल पद्धतीने तपासता येईल आणि प्रत्यक्ष प्रोटोटाईप तयार करण्यापूर्वीच त्याची चाचणी होईल.
जागतिक दर्जाच्या बस व ट्रक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. डसॉल्ट सिस्टिम्ससोबतची भागीदारी आम्हाला जलद, अचूक आणि स्मार्ट डिझाईन करण्यास मदत करेल.”
डसॉल्ट सिस्टिम्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक दीपक एनजी म्हणाले, “वाहनांचे भविष्य आधी व्हर्च्युअल जगात तयार होईल आणि नंतर रस्त्यावर उतरेल. ओलेक्ट्रासोबतची भागीदारी भारताच्या ई-मोबिलिटी क्षेत्राला नवे बळ देईल.”
ओलेक्ट्राने आतापर्यंत देशभरात 3,800 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली आहेत. कंपनीकडे 10,000 पेक्षा जास्त वाहनांची मागणी नोंदवलेली आहे. आणि 550 दशलक्षाहून अधिक हरित किलोमीटर चाल कंपनीच्या वाहनांनी पूर्ण केली आहे.