Apache RTR 180 आणि RTR 160 घेताय? पहिल्यांदा ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या…

| Updated on: Sep 10, 2022 | 9:08 PM

टीव्हीएसने आपाचे आरटीआर 160 आणि आपाचे आरटीआर 180 चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. दोन्ही बाईक खास फीचर्स अन्‌ अपडेटेड लूक तसेच नवीन राइड मोड्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. जर तुम्ही देखील दोघांमध्ये एका बाईकची निवड केली असेल तर, या लेखाच्या पाच गोष्टी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत.

Apache RTR 180 आणि RTR 160 घेताय? पहिल्यांदा ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या...
Follow us on

टीव्हीएस मोटर (TVS) कंपनीने आपाचे आरटीआर 180 (Apache RTR 180) आणि आपाचे आरटीआर 160 (Apache RTR 160) चे नवीन मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने दोन्ही लेटेस्ट बाइक्स अनेक अपडेट्ससह बाजारात आणल्या आहेत. नवीन फीचर्स, लूक आणि डिझाइन व्यतिरिक्त, ग्राहकांना नवीन आपाचे बाइक्समध्ये नवीन रायडिंग मोड देखील मिळाले आहेत. आपाचे आरटीआर 180 ची एक्सशोरूम किंमत 1.30 लाख रुपये आहे, तर आपाचे आरटीआर 160 ची एक्सशोरूम किंमत 1.17 लाख रुपये आहे. या रेंजमधील दोन्ही बाइक्स दमदार परफॉर्मन्ससह उपलब्ध आहेत. आपाचे आरटीआर 180 आणि आरटीआर 160 शी संबंधित पाच हायलाइट्स या लेखातून बघणार आहोत.

डिझाईनमध्ये बदल : TVS Apache RTR 180 आणि RTR 160 ची मूळ डिझाईन तशीच असली तरी या वेळी टीव्हीएसने अद्ययावत ग्राफिक्स, नवीन डिझाइन केलेले हेडलाइट आणि नवीन टेललाइट यांची भेट ग्राहकांना दिली आहे. याशिवाय लेटेस्ट बाइक्समध्ये नवीन बॉडी पॅनल्स आणि फ्रंट काऊलवर फॉक्स व्हेंट्स देण्यात आले आहेत.

खास फीचर्स : दोन्ही बाईकमध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टीव्हीएस SmartXonnext आणि सेगमेंटची पहिली व्हॉइस असिस्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत. दोन्ही नवीन आपाचे मॉडेल्समध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, गियर पोझिशन इंडिकेटर आणि शिफ्ट असिस्ट, कॉल आणि नोटिफिकेशन अलर्ट, रेस टेलिमेट्री आणि लॅप टाइमर मोड यांसारखी फीचर्सदेखील देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन इंजिन पर्याय : आपाचे आरटीआर 180 आणि आरटीआर 160 चे 2022 मॉडेल्समध्ये दमदार इंजिन देण्यात आले आहे. आरटीआर 160 ला पूर्वीप्रमाणेच 159.7 सीसी पेट्रोल इंजिन मिळते, तर आरटीआर 180 ला 177.4 पीएस पेट्रोल इंजिन मिळणार आहे.

बाइक राइड मोड : आपाचेच्या दोन्ही नवीन मॉडेल्समध्ये पहिल्यांदाच राइड मोड देण्यात आला आहे. टीव्हीएसने आपल्या ग्राहकांना स्पोर्ट, अर्बन आणि रेन मोड असे तीन राइड मोड दिले आहेत. निवडलेल्या राइड मोडवर बाइक थ्रॉटल मॅपिंग आणि एबीएसमध्ये बदलता येते.

किंमत : आपाचे आरटीआर 160 तीन प्रकारांमध्ये येत असून त्यात, ड्रम, डिस्क आणि डिस्क बीटी यांचा समावेश आहे. त्यांची एक्सशोरूम किंमत अनुक्रमे 1,17,790 रुपये, 1,21,290 रुपये आणि 1,24,590 रुपये आहे. दुसरीकडे आरटीआर 180 डिस्क बीटी मात्र या एकाच प्रकारात येत असून तिची एक्सशोरूम किंमत 1,30,590 रुपये एवढी आहे.