Renault ची किफायतशीर कॉम्पॅक्ट SUV लाँचिंगसाठी सज्ज, Tata Punch ला टक्कर

| Updated on: Dec 08, 2021 | 6:30 AM

रेनॉल्ट (Renault) कंपनी खास कॉम्पॅक्ट साइज एसयूव्ही कार सादर करणार आहे, या कारचे नाव ऑस्ट्रल (Austral) असे असेल. हे नाव लॅटिन भाषेतून आले आहे.

Renault ची किफायतशीर कॉम्पॅक्ट SUV लाँचिंगसाठी सज्ज, Tata Punch ला टक्कर
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : रेनॉल्ट (Renault) कंपनी खास कॉम्पॅक्ट साइज एसयूव्ही कार सादर करणार आहे, या कारचे नाव ऑस्ट्रल (Austral) असे असेल. हे नाव लॅटिन भाषेतून आले आहे. Austral चा अर्थ दक्षिणेकडील असा आहे. या कारचे उत्पादन पॅलेन्सिया कारखान्यात केले जाईल. फ्रेंच कार मेककने टीझर रिलीज करताना या नवीन मॉडेलबद्दल सांगितले आहे. टीझर नोटमध्ये असे म्हटले आहे की, हे नवीन मॉडेल सी सेगमेंटमध्ये रेनॉला पॉवर देईल. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Arkana आणि नवीन Megane E-TECH इलेक्ट्रिक मॉडेल्सना टक्कर देणार आहे. (Renault Austral SUV to launch in 2022, Compact Suv can give Competition to Tata Punch in Indian Market)

Renault Austral SUV पहिल्यांदा युरोपियन बाजारात दाखल होईल, त्यानंतर ती इतर देशांमध्ये लॉन्च केली जाईल. ही कार भारतात कधी लॉन्च होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, Renault कडे भारतात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये कोणतीही कार नाही. त्यामुळे कंपनी ही कार जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर लगेच भारतात देखील लाँच करु शकते.

ऑस्ट्रल हे नाव australis या लॅटिन शब्दावरून आले आहे. कंपनी ऑस्ट्रल नावाची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही तयार करत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये इको ड्रायव्हिंग मोड आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी मिळेल. तसेच, ही कार 4.51 मीटरची कार असेल. या कारमध्ये पाच लोकांसाठी पुरेशी जागा आणि आरामदायी सीट्स असतील.

Austral SUV चे संभाव्य फीचर्स

रेनॉल्टने कारचे इंजिन आणि फीचर्सविषयीची माहिती सादर केलेली नाही. मात्र काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही आगामी SUV कार Alliance च्या CMF प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या प्लॅटफॉर्मवर Nissan Qashqai SUV कार तयार करण्यात आली आहे. Austral SUV साठी नवीन 1.3 लीटर पेट्रोल इंजिन तयार केले जात आहे. हे इंजिन 140 hp पॉवर जनरेट करू शकते. तसेच त्यात हायब्रीडचा पर्यायही मिळू शकतो.

Austral SUV पुढच्या वर्षी लाँच होणार

ऑस्ट्रल एसयूव्ही 2022 च्या उत्तरार्धात सादर केली जाऊ शकते. मात्र अद्याप कंपनीने या कारच्या लॉन्चबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. Austral SUV भारतात लॉन्च झाल्यास, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती टाटा पंचला टक्कर देईल. गेल्या महिन्यात टाटा पंच सादर करण्यात आली आहे आणि या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर


(Renault Austral SUV to launch in 2022, Compact Suv can give Competition to Tata Punch in Indian Market)