देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ

रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच केली होती.

देशातील सर्वात स्वस्त SUV महागली, Renault Kiger च्या किंमतीत 33000 रुपयांची वाढ
Renault Kiger
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 4:18 PM

मुंबई : रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) यावर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच केली होती. ही कार सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे डिलीव्हरीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी Renault Kiger च्या तब्बल 1100 युनिट्सची डिलिव्हरी केली. त्या दिवसापासून कारची भारतीय बाजारात घोडदौड सुरु आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपये (बेस मॉडेल) ठेवण्यात आली होती. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. ही देशातील सर्वात स्वस्त एसयूव्हींपैकी एक आहे. अशातच आता कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Renault Kiger Prices Increased By Up To Rs 33000, check New Prices)

फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉने त्यांच्या सब-कॉम्पॅक्ट SUV Renault Kiger च्या किंमती वाढवल्या आहेत. लाँचिंगनंतर 3 महिन्यांनी कंपनीने या कारची किंमत 33,000 रुपयांपर्यंत महाग केली आहे. रेनॉने या वाढीमागील कोणतेही कारण अधिकृतपणे सांगितले नाही, तरी ही किंमत वाढविण्याच्या निर्णयामागील जागतिक स्तरावरील चिपची कमतरता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Renault Kiger SUV या कारच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत कंपनीने वाढ केलेली नाही. कायगरच्या आरएक्सई एनर्जी एमटी आणि आरएक्सई एनर्जी एमटी ड्युअल टोन या बेस व्हेरिएंटच्या किंमती अनुक्रमे 5.45 लाख रुपये आणि 5.65 लाख रुपये अशा आहेत. परंतु इतर व्हेरिएंट्सच्या किंमती 3000 रुपये ते 33000 रुपयांदरम्यान वाढवण्यात आल्या आहेत.

रेनॉ कायगरच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती

  • RXE 1.0L ENERGY MT – ₹5,45,000
  •  RXE 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹5,65,000
  •  RXL 1.0L ENERGY MT – ₹6,32,000
  •  RXL 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹6,52,000
  •  RXT 1.0L ENERGY MT – ₹6,80,000
  •  RXL EASY-R AMT 1.0L ENERGY – ₹6,82,000
  •  RXT 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹7,00,000
  •  RXL EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹7,02,000
  •  RXT EASY-R AMT 1.0L ENERGY – ₹7,30,000
  •  RXL 1.0L TURBO MT – ₹7,42,000
  •  RXT EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹7,50,000
  •  RXL 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹7,62,000
  •  RXZ 1.0L ENERGY MT – ₹7,69,000
  •  RXZ 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹7,89,000
  •  RXT 1.0L TURBO MT – ₹7,90,000
  •  RXT 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹8,10,000
  •  RXZ EASY-R AMT 1.0L ENERGY –  ₹8,19,000
  •  RXZ EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹8,39,000
  •  RXT X-TRONIC (CVT) 1.0L TURBO –  ₹8,60,000
  •  RXZ 1.0L TURBO MT – ₹8,79,000
  •  RXT X-TRONIC (CVT) 1.0L TURBO DUAL TONE – ₹8,80,000
  •  RXZ 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹8,99,000
  •  RXZ X-TRONIC (CVT) 1.0L TURBO – ₹9,55,000
  •  RXZ X-TRONIC (CVT) 1.0L TURBO DUAL TONE – ₹9,75,000

(वर दिलेल्या सर्व किंमती एक्स शोरूम नवी मुंबई)

दमदार इंजिन

रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल.

Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला रेनॉ कायगरच्या सर्व वेरियंट्सच्या किंमतीबाबतची माहिती देणार आहोत. जेणेकरुन त्यापैकी कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे तुम्ही ठरवू शकाल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कारची निवड करु शकाल.

बेस्ट एसयूव्ही?

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

या गाड्यांना टक्कर

भारतीय बाजारात Kiger ची ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite), किआ सोनेट (Kia Sonet), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) या गाड्यांशी जोरदार स्पर्धा सुरु आहे.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

(Renault Kiger Prices Increased By Up To Rs 33000, check New Prices)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.