
Renault कार कंपनी इतकी वर्षे भारतात कार्यरत असून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक व्हेईकल मार्केटमध्ये तिने मोठ्या प्रमाणावर पाऊल ठेवलेले नाही.या फ्रेंच ऑटोमेकरने आपल्या कारचे अनेक मॉडेल बाजारात आणले आहेत. परंतू इलेक्ट्रीक Renault Kwid लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. कारण चेन्नईत Renault Kwid इलेक्ट्रीक कारचे तयार व्हर्जन टेस्टींग करताना दिसले आहे. या नव्या मॉडेलला क्विड हॅचबॅकला नवे डिझाईल दिले गेले आहे.तर काही नेहमीचे फिचर कायम ठेवले आहेत.
Renault Kwid रेनॉ क्विड EV ला Dacia Spring EV च्या धर्तीवर तयार केले जात आहे. वास्तविक हे रोमानियाची इलेक्ट्रीक हॅचबॅक कारचे सुधारित व्हर्जन आहे. दोन्हीत बहुतांशी फिचर आणि स्पेसिफिकेशन एक सारखेच असण्याची शक्यता आहे. डिझाईनचे काही हिस्से वेगळे असतील. मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या स्पाई फोटोत दिसलेल्या टेस्ट मॉडेलमध्ये एक्झॉर्स्ट सिस्टीम नाही.त्यामुळे ही कार इलेक्ट्रीक असल्याचे स्पष्ट होते. या कारमध्ये नवा फ्रंट लूक दिलेला आहे. ज्यात वरती स्लिम LED DRLs आणि खाली हॅलोजन प्रोजेक्टर हेडलँड लागलेला आहे. सर्वसामान्य इलेक्ट्रीक कारमध्ये असेत त्यानुसार ग्रिलला संपूर्ण बंद केलेले आहे.
क्विड EV मध्ये सर्वात मोठा बदल हा याच्या आतील भागात झाला आहे. या नवीन केबिन लेआऊट दिला आहेत. ड्रायव्हरला नवीन स्टीअरिंग व्हिल दिले आहे. आणि मोठा डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. फोटोत पाहून यात कारमध्ये नवा आणि मोठा टचस्क्रिन्स इंफोटेनमेंट सिस्टीम दिला आहे. यात नवीन युजर इंटरफेस (UI) डिझाईन आहे. यात हाईट एडजेस्टेबल ड्रायव्हर सिट, लेदर सिट कव्हर, क्लायमेंट कंट्रोल आणि रिअर सेंटर आर्मरेस्ट सारखे फिचर देखील मिळणार आहेत.Dacia Spring EV मध्ये लेव्हल -1 ADAS( एडवांस्ड ड्रायव्हर असिस्ट सिस्टम)देखील देण्यात आला आहे. परंतू हे पाहावे लागेल हे फिचर भारतातील कार मॉडेलमध्ये असेल की नाही
क्विड EV मध्ये Dacia Spring EV सारखे पॉवर सेट मिळण्याची शक्यता आहे. यात दोन इलेक्ट्रीक मोटर व्हेरिएंट असतील. एक 45 बीएचपी (33 किलोवॅट) आणि दुसरा 65 एचपी (48 किलोवॅट). दोन्हींना 26.8 kWh ची बॅटरीने पॉवर मिळेल. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 304 किमीपर्यंत रेंज देऊ शकते.