केवळ 55 जणच खरेदी करू शकतात ही कार; जंगल, डोंगरावर दामटा आरामात, Thar ला देते टक्कर

भारतात 2 वर्षांपूर्वी ही कार बाजारात आली आणि ग्राहकांच्या तिच्यावर उड्या पडल्या. ही SUV खरेदी करण्यासाठी क्रेझ दिसून आली. पण आता या कंपनीने जी खास आवृत्ती बाजारात आणली. ती कार केवळ 55 लोकच खरेदी करू शकतील.

केवळ 55 जणच खरेदी करू शकतात ही कार; जंगल, डोंगरावर दामटा आरामात, Thar ला देते टक्कर
केवळ 55 जणांसाठीच ही खास कार
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 27, 2025 | 2:54 PM

Suzuki Jimmy 55th Anniversary Edition : सुझुकी कंपनीने तिची आयकॉनिक ऑफ रोड कार जिम्मीची एक खास आवृत्ती बाजारात आणली आहे. 55 व्या वर्धापन दिनानिमत्त ही आवृत्ती आणण्यात आली. ही कार केवळ 55 लोकच खरेदी करू शकतील. या 55 कार सध्या फ्रान्समध्येच मिळतील. युरोपमधील पर्यावरणीय कडक उत्सर्जन नियमांमुळे जिम्मी आता तिथे दिसणार नाही. त्यामुळे या कारची ही खास आवृत्ती तयार करण्यात आली आहे. हे मॉडेल जिम्मीच्या लोकप्रियतेसाठी समर्पित करण्यात आले आहे.

या खास एडिशनमध्ये जुन्या कारची डिझाई, खास फिचर्स आणि काही ठेवणीतील घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही एडिशन आणि या कारचा लूक एकदमच खास झाला आहे. या खास आवृत्तीने कार प्रेमींच्या मनात घर केले आहे. या कारची किंमत €28,955 (जवळपास 28.75 लाख रुपये) आहे. फ्रान्समध्ये ही कार या महिन्याच्या अखेरीस बाजारात उतरवण्याची शक्यता आहे.

डिझाईनमध्ये काय खास

जिम्मी 55 व्या वर्धापन दिनाची आवृत्ती एकदम खास आहे. या कारला एकदम रेट्रो स्टाईल लूक देण्यात आला आहे. या खास आवृत्तीत कारला जुन्या कारसारखी बॉडीच्या बाजूला विंटेजसारखे पट्टे, चमकदार लाल स्प्लॅश गार्ड आणि स्पेअर टायरवर गेंड्याचे (Rhino) चित्र असलेले चमकदार कव्हर, त्यात जिम्मीचा दमदारपणा दाखवते. तर नेहमी दिसणाऱ्या S लोगोच्या ऐवजी Suzuki हे नाव संपूर्णपणे दिसते. काळ्या रंगाचे दमदार स्टील व्हिल्स या कारच्या वैभवात भर घालतात. ही कार ऑफ रोडवर एकदम खुलून दिसते.

इंजिन आणि वैशिष्ट्ये

यापूर्वीच्या जिम्मीप्रमाणे ही कार आहे. यामध्ये 1.5- लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. ते 101 bhp पॉवर आणि 130Nm चे टॉर्क देते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि Suzuki चे AllGrip Pro 4WD सिस्टिम देण्यात आले आहे. यामध्ये लो-रेंज ट्रांसफर केसचा पण समावेश आहे. या कारचे वजन केवळ 1,090 किलोग्रॅम आहे. ही कार ग्रामीण रस्ते, डोंगराळ भागात डौलात आणि दणक्यात धावते. हे एक छोटी पण ग्रामीण भागासाठीची दमदार कार आहे.