Bank Holiday : जुलै महिन्यात बँकांना इतक्या दिवस ताळे; सुट्ट्यांची यादीच पाहा
July Bank Holiday : जुलै 2025 मध्ये सुट्यांचा हंगाम आहे. देशभरात एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामळे बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर ते अगोदर करून घ्या. पुढील महिन्यातील सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाका.

Bank Holiday list July 2025 : जुलै 2025 मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी मिळून देशातील बँका जवळपास 13 दिवस बंद (Bank Holiday July 2025) असतील. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रातील बँका दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्या शनिवारी सुरू असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँका सर्व सार्वजनिक सणांच्या दिवशी बंद राहतील. काही बँका स्थानिक सुट्यांच्या दिवशी बंद असतील. स्थानिक सुट्या जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून निश्चित होतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील बँका दर रविवारी बंद असतात. त्यामुळे बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर अगोदर करून घ्या अथवा सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाका.
जुलै महिन्यात एकूण 13 सुट्या
जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशीपण सुट्या आहेत. या सुट्यांची सुरुवात येत्या 3 जुलैपासून होणार आहे. काही राज्य वगळता संपूर्ण देशात या सुट्या लागू असतील. तर 6 सुट्या या शनिवार आणि रविवार मिळून असतील. जुलै महिन्यात 4 रविवार तर दोन शनिवार आहेत. जुलै महिन्यात एकूण 13 सुट्या असतील. जर बँकेत अत्यंत महत्वाचे काम असेल तर ते लवकर उरकून घ्या. नाहीतर सुट्टयांची यादी पाहूनच बँकेत जा.
संपूर्ण देशात इतक्या दिवस बंद असतील बँका
या जुलैमध्ये एकूण 4 रविवार आणि दोन शनिवार (दुसरा आणि चौथा) बँका बंद असतील. या कारणामुळे या काळात एकूण सहा दिवस देशभरातली बँका बंद असतील. जुलै महिन्यात कोणत्या तारखेला रविवार आणि शनिवार आहेत, ते जाणून घेऊयात.
12 जुलै (शनिवार) –दुसरा शनिवार
26 जुलै (शनिवार) – चौथा शनिवार
सर्व रविवार – 6, 13, 20 आणि 27 जुलै
या राज्यात सुट्ट्यांचा मांडव
त्रिपुरा :
3 जुलै (गुरूवार) – खारची पूजा, बँक बंद असेल
19 जुलै (शनिवार) – केर पूजा, बँकेला ताळे
जम्मू आणि काश्मीर :
5 जुलै (शनिवार) – गुरु हरगोविंदजी यांची जयंती, बँकेला सुट्टी
मेघालय:
14 जुलै (सोमवार) – बेह देन्खलम निमित्ताने बँकेला सु्ट्टी
17 जुलै (गुरूवार) – उतिरोत सिंह यांची पुण्यतिथी, बँका बंद
उत्तराखंड :
16 जुलै (बुधवार) – हरेला निमित्त बँका बंद
सिक्किम:
28 जुलै (सोमवार) – द्रुकपा छे-जी सणानिमित्त बँका बंद
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
