पावसाळ्यात इलेक्ट्रीक स्कुटरची अशी काळजी घ्या, बॅटरीला असे जपा…

Electric scooter use in monsoon : सध्या इलेक्ट्रीक स्कूटरचा जमाना आहे. ओलापासून एथरपर्यंत तर सुझुकीपासून होंडा कंपन्याही इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात आणत आहेत. पावसाळ्यात इलेक्ट्रीक स्कूटरची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते..

पावसाळ्यात इलेक्ट्रीक स्कुटरची अशी काळजी घ्या, बॅटरीला असे जपा...
Riding an electric scooter in Monsoon
| Updated on: Jun 06, 2025 | 4:17 PM

सध्या इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती पाहून आता इलेक्ट्रीक वाहनांना सुगीचे दिवस आले आहेत. परंतू पावसाळ्याच इलेक्ट्रीक वाहनांची अधिक काळजी घ्यावी लागते. आणि ते वाहून दुचाकी असेल तर आणखीनच जपावे लागते. बाजारात एकामागोमाग इलेक्ट्रीक स्कूटर दाखल झाल्या आहेत. या इलेक्ट्रीक स्कुटरची बॅटरी IP67 रेटिंग सह येते. परंतू मान्सूनचे आगमन झाले असल्याने तुम्हाला काळजी तर घ्यावी लागणार आहेच. चला तर पाहूयात मान्सून मध्ये इलेक्ट्रीक स्कूटरची काळजी कशी घ्यायची ते….

पार्किंगची काळजी घ्या –

पावसाळ्यात सर्वाधिक चिंता पार्किंगची असते. तर तुमच्याकडे ई- स्कूटर असेल तर मुसळधार पावसात स्कूटर कुठे पार्किंग करायची ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे ई-स्कूटरची पार्कींग नेहमी शेड असेल तेथेच करावी. त्यामुळे मुसळधार पावसाने स्कूटरला काही प्रॉब्लेम होणार नाही.

असे मार्ग टाळणेच उत्तम –

पावसाळ्यात मुंबईसारख्या शहरात जास्त पाऊस झाला तर लगेच पाणी साचू लागते. हल्ली तर मुसळधार पाऊस कुठेही पडू लागला आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक स्कूटर चालकांनी ज्या मार्गावर सखल भाग आहे तेथे जाणे टाळले पाहीजे. कारण इलेक्ट्रीक स्कूटरचे पार्ट्स खूपच सेन्सेटीव्ह असतात आणि पाणी जाऊन त्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे अशा मार्गांना टाळणेच उत्तम…

चार्जरलाही पाण्यापासून वाचवा-

इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये चार्जर सर्वात महत्वाचा पार्ट्स असतो. पावसाळ्यात जर तुमच्या चार्जरला भिजण्यापासून वाचवायचे असेल तर काळजी घ्यायची गरज आहे. जर चार्जरमध्ये पाणी शिरले तर शॉर्ट सर्कीट होऊ शकते. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते तसेच बॅटरी देखील खराब होऊ शकते, त्यामुळे नाहक भूर्दंड बसण्याची शक्यता आहे.

याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते –

पावसाळ्यात चार महिने ई-स्कूटरच्या बॅटरीची काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे बॅटरीची वेळोवेळी तापसणी करणे गरजेचे आहे. जर स्कुटरमधून विचित्र आवाज येत असेल तर लागलीच मॅकनिकला दाखवले पाहीजे. इलेक्ट्रीक वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च जास्त असू शकतो. त्यामुळे स्कूटरचा इंश्योरन्स काढलेला असावा. अनेक इन्शुरन्स पावसाळ्यातील बिघाड कव्हर करीत नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स काढताना नियम आणि अटी नीट काळजी पूर्वक वाचूनच इंश्योरन्स काढण्याचा निर्णय घेतला पाहीजे..