AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki च्या सर्वात स्वस्त 7 सिटर कारच्या खपाचा विक्रम, मोडले सर्व रेकॉर्ड

India’s Cheapest Seven-Seater Car : भारताची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने पुन्हा एकदा डोमेस्टीक ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपली पोझीशन मिळवत विक्रम केला आहे.

Maruti Suzuki च्या सर्वात स्वस्त 7 सिटर कारच्या खपाचा विक्रम, मोडले सर्व रेकॉर्ड
| Updated on: Jun 04, 2025 | 5:06 PM
Share

मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या मारुती सुझुकी कंपनीने तिच्या सेव्हन सिटर कारच्या खपाचा विक्रम केला आहे. मारुती सुझुकी कंपनीने मे २०२५ मध्ये १,८०,०७७ वाहनांची विक्री करीत गेल्या वर्षीच्या कारच्या खपाच्या तुलनेत तीन टक्के प्रगती केली आहे. विशेष म्हणजे यात मारुतीच्या सर्वात स्वस्त 7 सिटर कार मारुती ईकोचा वाटा १२,३२७ इतका आहे.

भारताची सर्वात स्वस्त सेव्हन सीटर कार

मारुती इकोमध्ये पाच, सहा आणि सात सिटर आसनांचे मॉडेल येतात. या कार सर्वात स्वस्त गणल्या जातात. युटीलिटी आणि अफॉर्डीबिलिटीत ही कार सर्वात बजेट फ्रेंडली कार म्हटली जाते. या कारची किंमत अवघी 5.70 लाख रुपये आहे.ईको कारची मागणी कायम आहे. ही कार देशातील सर्वाधिक बजेट फ्रेंडली कार म्हटले जाते. इकोची मागणी कायम असून गेल्या सात महिन्यात मे २०२५ मध्ये या कारचा सर्वाधिक सेल झाला आहे.

अलिकडे या कारने बाजारातील 15 वर्षे पूर्ण केली असून मारुती सुझुकी इकोने तिचे लाँचिंग झाल्यानंतर १२ लाख युनिट्ची विक्री केली आहे. या कारची लोकप्रियता इतकी आहे की या कारचा गेल्या कॅलेडंर वर्षांतील महिन्याचा सरासरी सेल 11,391 युनिट्स इतका आहे. सध्या कॉम्पॅट तसेच मिडसाईज सुव्हचा जमाना असूनही या कारची लोकप्रियता जराही कमी झालेले नाही.

 57 टक्के विक्री ही पेट्रोल व्हेरीएंटची

मारुती सुझकीने दिलेला अहवाल पाहाता 57 टक्के विक्री ही पेट्रोल व्हेरीएंटची होत आहे, तर उर्वरित ४३ टक्के सेल सीएनजी व्हेरिएंटमधून येतो.या इको कारचे १३ डिफरन्ट व्हेरिएंट बाजारात उतरवलेले आहेत. यात पाच सिटर, सेव्हर सिटर अशा पर्यायात या कारची विक्री केली जाते. कार्गो, टुर आणि एम्ब्युलन्स मॉडेल्स मेकींग ही व्हर्सटाईल चॉईस असून पर्सनल, कमर्शियल, इमर्जन्सी एम्ब्युलन्स अशा वापरासाटी ही कार वापरली जात आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.