AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फायटर जेटवरुन स्ट्राईक ! तेजसला का होतोय उशीर?, वायुसेनाप्रमुखांनी HAL वर का तोफ डागली ?

तेजस Mk-1 A डिलीव्हरीला झालेल्या विलंबामुळे हवाई दलाच्या चिंतेत वाढ झाली आहे. भारतीय वायू सेनेचे प्रमुख अमर प्रित सिंह यांनी दुसऱ्यांदा हिंदूस्थान एअरोनॉटिक्स कंपनीवर तोफ डागली आहे.

फायटर जेटवरुन स्ट्राईक ! तेजसला का होतोय उशीर?, वायुसेनाप्रमुखांनी HAL वर का तोफ डागली ?
Indian Air Force Chief A.P. Singh
| Updated on: May 30, 2025 | 5:33 PM
Share

भारतीय वायुसेनेचे (IAF) स्वदेशी तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) Mk-1A ची डिलीव्हरी देण्यास होत असलेल्या दीरंगाईने भारतीय वायू सेना प्रमुख अमर प्रित सिंह यांनी पुन्हा आगपाखड केली आहे. ए.पी.सिंह यांनी दुसऱ्यांदा हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)वर तोफ डागली आहे. ते म्हणाले की या विमानांची वेळेवर डिलिव्हरी न होणे ही मोठी समस्या आहे. का आहे एलसीए तेजस महत्वाचे ? हे पाहूयात….

तेजस Mk-1A निर्मितीला का उशीर

तेजस Mk-1A एक उन्नत स्वदेशी फायटर जेट आहे. जे आपल्या वायू दलातील MiG-21, MiG-27 आणि जग्वार या विमानांची जागा घेणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये वायुसेनेने HAL सोबत 48000 कोटी रुपयांचा करार केला होता.ज्यात 83 तेजस Mk-1A फायटर जेट्सची डिलीव्हरी होणे अपेक्षित होते. पहीले जेट 31 मार्च 2024 पर्यंत मिळणे अपेक्षित होते. परंतू डेडलाईन मिस झाली आहे. आता HAL ने नोव्हेंबर 2024 पासून या विमानांची डिलीव्हरी सुरु होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

तेजस Mk-1A हे एक प्रगत स्वदेशी फायटर जेट आहे. हे विमान आपल्या वायू दलातील MiG-21, MiG-27 आणि जग्वार या विमानांची जागा घेणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये वायुसेनेने HAL सोबत 48000 कोटी रुपयांचा करार केला होता. ज्यात 83 तेजस Mk-1A फायटर जेट्सची डिलीव्हरी होणे अपेक्षित होते. पहीले जेट 31 मार्च 2024 पर्यंत मिळणे अपेक्षित होते. परंतू डेडलाईन मिस झाली आहे. आता HAL कंपनीने नोव्हेंबर 2024 पासून या विमानांची डिलीव्हरी सुरु होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

29 मे 2025 रोजी CII बिझनस समिटमध्ये वायू सेना प्रमुख अमर प्रित सिंह यांनी या जेट फायटरच्या डिलिव्हरी बाबत निश्चित केलेल्या डेडलाईनबाबत समस्या हाच एक मोठा मुद्दा असल्याचे म्हटले होते. उद्योगांनी तिच आश्वासने द्यायला हवीत, जी ती वेळेत पूर्ण करु शकतील अशी जहरी टीका वायू सेना प्रमुखांनी केली होती. फेब्रुवारी 2025 च्या एअरो इंडिया शोमध्ये त्यांनी HAL कंपनीवर आपला विश्वास नसल्याचे सुतोवाच वायू सेना प्रमुखांनी केले होते. आम्ही मिशन मोडमध्ये काम करीत नाही. HAL आमची भारतीय कंपनी आहे. याचा अर्थ ऑर्डर मिळतील. आम्ही प्रयत्न करु असा वायदा चालणार नाही अशा शब्दात वायू सेना प्रमुख ए.पी.सिंह संतापले होते.

तेजसला उशीर का ?

इंजन्सची कमतरता – अमेरिकेची कंपनी GE Aerospace आपल्याला 99 F404-IN20 इंजिन देणार होती. परंतू या इंजिनांच्या पुरवठ्यास दोन वर्षांचा उशीर झाला आहे. याचे कारण कोरोना काळ आणि पुरवठा साखळीतील समस्या आणि द.कोरियाची कंपनीकडे सुट्या भागांची असलेली कमतरता ही अनेक कारणे यास जबाबदार आहेत.मार्च 2025 मध्ये HAL कंपनीला पहिले इंजिन मिळाले आहे. आणखी 12 इंजिन्स या वर्षअखेर मिळण्याची आशा आहे.

तांत्रिक उशीर – नव्या सिस्टीममध्ये EL/M-2052 आणि उत्तम AESA रडार, इलेक्ट्रॉनिक वारफेअर सूट आणि सॉफ्टवेयर अपडेट अशा सर्टिफिकेशनमध्ये उशीर झाला आहे. जानेवारी 2025मध्ये Astra मिसाईल आणि रडारचे टेस्ट सुरु झाले आहेत.

उत्पादनाची समस्या .. HAL ची बंगलुरु आणि नासिक फॅसिलिटीमध्ये अत्यंत उशीराने उत्पादन होत आहे. तरीही, नाशिकमध्ये नवीन प्रोडक्शन लाईन सुरू झाली आहे.त्यामुळे आता वार्षिक 16-24 जेट्स बनण्याची क्षमता असणार आहे.

वायुसेनेची चिंता... वायुसेने जवळ आता 31 स्क्वॉड्रन आहेत. मात्र,गरज 42 स्क्वॉड्रन आहे. जुने MiG-21, MiG-27 आणि जग्वार विमान निवृत्त होत चालली आहेत, त्यामुळे युद्ध क्षमतेवर प्रभाव पडत आहे. तेजस Mk-1A जर उशीर झाला तर ही गॅम मोठी होईल अशी भीती व्यक्त होत आहे. साल 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सीमावर तणाव वाढल्यानंतर वायू सेनेकडे विमानांचा मोठा ताफा असावा अशी मागणी होत आहे.

HAL चेअरमन काय म्हणाले ?

दुसरीकडे HAL चे चेअरमन डी.के. सुनील यांनी मात्र तांत्रिक अडचणींवर मात केलेली आहे. आता इंजिन्सची डीलिव्हरी सुरु झाली की आम्ही उत्पदनाचा वेग वाढवू असे म्हटले आहे.

2025 मध्ये डिलीव्हरी: या वर्ष अखेर 12 तेजस Mk-1A जेट्सचा पुरवठा होण्याची शक्यता

83 जेट्सचा करार: 2028 पर्यंत 83 जेट्सची डिलीव्हरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ

नवी प्रोडक्शन लाईन : बंगलुरु आणि नाशिक येथे तीन प्रोडक्शन लाईन मधून वर्षाला 24 जेट्स बनवले जाणार

खाजगी कंपन्यांशी भागीदारी: Alpha Tocol सारख्या खाजगी कंपन्या फ्यूजलेज सप्लाय करत आहेत.

GE Aerospace चा दावा

GE Aerospace ने मार्च 2025 मध्ये पहिले F404-IN20 इंजिन HAL पुरवले. HAL कंपनीने सांगितले की सप्लाय चेनची समस्या सोडविण्यात आली आहे. साल 2025मध्ये 12 इंजिन्स पाठविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यांत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे.

भविष्यातील योजना काय ?

97 जेट्सचीऑर्डर: वायुसेना 67,000 कोटी रुपयांतून भविष्यात आणखी 97 Mk-1A जेट्स ऑर्डर करण्याची योजना तयार करीत आहे. ही ऑर्डर साल 2031 पर्यंत पूर्ण होणार आहे.

तेजस Mk-2: तेजस – 2 हे नवे शक्तिशाली GE-F414 इंजनासह सुसज्ज जेट फायटरचे चाचणी उड्डाण साल 2025 च्या अखेर किंवा 2026 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

AMCA प्रोजेक्ट: 5 व्या पिढीचे AMCA जेट देखील बनविण्याची योजना सुरु आहे. परंतू त्याच्या डिलिव्हरीला उशीर होण्याची शक्यता असल्याने हलक्या वजनाचे लढाऊ फायटर जेट तेजसची निर्मिती वेगाने होणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. परंतु एचएएल आणि जीई एरोस्पेसने समस्या सोडवण्याचे वचन दिले आहे. २०२५-२६ पासून उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.