AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची थेट पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, मला..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच सुनेत्रा पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले. पहिल्यांदाच शरद पवार शपथविधीबद्दल बोलताना दिसले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची थेट पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, मला..
Sharad Pawar
| Updated on: Feb 04, 2026 | 9:49 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. या विमान अपघाताबद्दल संशय देखील व्यक्त केला जात आहे. अजित पवार आज आपल्यात नाहीत याचा विश्वास अजूनही लोकांना होत नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विलिगीकरणाबाबत विविध दावे केली जात आहेत. शरद पवार यांनी स्वत: म्हटले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलिगीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही किंवा अजित पवार यांनी याबाबत आमच्यासोबत चर्चा केली नाही.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांना जाऊन काही तास झाले असताच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या. दरम्यानच पवार कुटुंबातील वादही थेट पुढे आला. सुनेत्रा पवार यांनी आपल्याला कोणतीही कल्पना दिली नाही किंवा त्यांचा शपथविधी आहे हे देखील आपल्याला माहिती नसल्याने त्यांनी म्हटले.

आता नुकताच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलतानाही शरद पवार दिसले. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल काहीच बोलायचे नाही. शरद पवार यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले.

भारत आणि चीन सीमेवरीव सध्याच्या परिस्थितीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, या मुद्द्याची संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. राहुल गांधी यांनी चीन आणि भारत सीमेबद्दल संसदेत भाष्य केले, ज्यानंतर मोठा गदारोळ बघायला मिळाला. आता याबद्दलच बोलताना शरद पवार हे दिसत आहेत.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...