AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळा, आपण सर्वांना न्याय देऊ… निधनापूर्वी अजित दादांचा शेवटचा फोन कॉल कोणाला? ऑडिओ क्लिप समोर

अजित पवार यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल समोर आला असून, बारामतीमध्ये ही ऑडिओ क्लिप ऐकताना कार्यकर्त्यांना रडू कोसळले. "आम्ही सर्वांना न्याय देऊ," असे शब्द दादांनी शेवटच्या संवादात उच्चारले होते.

बाळा, आपण सर्वांना न्याय देऊ... निधनापूर्वी अजित दादांचा शेवटचा फोन कॉल कोणाला? ऑडिओ क्लिप समोर
ajit pawar last call
| Updated on: Feb 04, 2026 | 10:10 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. प्रशासनावरील पकड आणि कामाचा झपाटा असलेल्या अजित दादांचा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. मात्र तरी त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा फोन कॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामती पक्ष कार्यालयात अजित दादांची शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. ती ऐकताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

विमान लँडिंगच्या काही मिनिटे आधी केला फोन

काटेवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजित दादांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवटच्या संवादाबद्दल सविस्तर माहिती दिली. श्रीजीत यांनी सकाळी ८ वाजून १९ मिनिटाला दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता. बहुधा विमान हवेत असल्याने मेसेजला लगेच उत्तर मिळाले नाही, मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी तत्परतेने ८ वाजून ३७ मिनिटांनी श्रीजीत यांना कॉल केला.

काय होता तो शेवटचा संवाद?

श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी सुमारे एक मिनिटाचा संवाद साधला जात आहे. या संभाषणात अजित पवारांच्या आवाजात तीच कामाची ओढ आणि सर्वसमावेशकतेची भावना दिसून आली. श्रीजीत यांनी सांगितले की मी इतका महत्त्वाचा नव्हतो की दादांनी लँडिंगच्या वेळी मला फोन करावा, पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांचा स्वभाव होता.

अजित पवार आणि श्रीजीत पवार यांचा संवाद

अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.

श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.

अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.

श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!

यानंतर अजित पवार आणि श्रीजीत पवार यांच्याशी असलेला संवाद संपला. त्यानंतर काहीच वेळात नियतीने घात केला.

संपूर्ण राज्यात शोककळा

अजित दादांच्या निधनानंतर बारामती आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा, ही सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही ही क्लिप ऐकवली, असे श्रीजीत यांनी सांगितले. अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जिद्द ही शेवटच्या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय