AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: राष्ट्रवादी विलीनि‍करणाच्या वादात फडणवीसांची उडी, शरद पवार यांची सणसणीत प्रतिक्रिया, सुनावले काय?

Sharad Pawar on Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसेच्या विलीनिकरणाचा मुद्दा अजूनही संपलेला नाही. हा मुद्दा तापलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची चर्चा झाली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितले असते असे म्हटले होते. त्याचा आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादी विलीनि‍करणाच्या वादात फडणवीसांची उडी, शरद पवार यांची सणसणीत प्रतिक्रिया, सुनावले काय?
शरद पवार, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 9:58 AM
Share

Sharad Pawar on Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणाबाबत दिवंगत अजितदादा पवार अनुकूल होते आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती असा दावा करण्यात येतो. तर दुसरीकडे अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही. महापालिका निवडणुकीपूरताच हा निर्णय झाल्याचे दादांच्या राष्ट्रवादी गटाचे म्हणणे आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला सांगितले असते, असे वक्तव्य केले होते. या संपूर्ण प्रकरणावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत चांगलेच सुनावले. त्यांनी दोन्ही पक्षांच्या विलीनि‍करणाबाबत मोठे भाष्य केले.

फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार नाही

अजितदादा यांच्या राष्ट्रवादीशी विलीनि‍करणाची चर्चा सुरू होती. 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा याविषयीची घोषणा करणार होते असे यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. आताच्या परिस्थिती आम्हाला राजकारण करायचं नाही. अन्यथा मी अनेक गोष्टी सांगू शकतो. मला सगळं माहिती आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की, अजितदादा आणि माझे जे संबंध होते त्यामुळे ते सगळ्या गोष्टी मला शेअर करायचे. त्यामुळे मला वाटतं की खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. अजित पवार हे जर अशा प्रकारची कोणत्याही विलीनि‍करणाची चर्चा करत असते तर ती भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

याविषयी आज शरद पवार यांना विचारण्यात आले असता. त्यांनी चांगलेच सुनावले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार हे यावर चर्चा करत होते, असे त्यांनी पुन्हा नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनि‍करणाच्या चर्चा सुरू होती असं शरद पवार यांनी पुन्हा अधोरेखित केल्याचे दिसून येते.

अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत मोठे भाष्य

महाराष्ट्र विधानसभा लोकसभा राज्यसभा गेले 58 वर्ष आहे. 58 वर्षात संसदेत माझी कधीही गैरहजरी नव्हती. अर्थसंकल्पातून ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा होती. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराबाबत दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.

अमेरिकेने काही समाधानकारक निर्णय घेतले.अमेरिकेने आपल्या देशवाबाबत टॅरिफ कमी केले. दोन दिवसांत भारत आणि अमेरिका बाबत चित्र स्पष्ट होईल. निर्यात करता येईल, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिका शक्तिशाली देश आहे. त्यांनी निर्यात करायला सुरुवात केली तर आपल्या शेतीवर परिणाम होईल असे वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?