Tata Motors | टाटा मोटर्सचे मार्केट जोरात… ‘या’ पाच कारची सर्वाधिक होतेय विक्री

| Updated on: May 15, 2022 | 11:03 AM

एप्रिल 2022 मध्ये, ऑटोमेकरने 41590 युनिट्‌सच्या विक्रीत तब्बल 66 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीची तुलना केल्यास 2021 मध्ये विकण्यात आलेल्या युनिट्‌सच्या तूलनेत ही सर्वाधिक वाढ जास्त आहे.

Tata Motors | टाटा मोटर्सचे मार्केट जोरात... ‘या’ पाच कारची सर्वाधिक होतेय विक्री
टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या
Image Credit source: Tata
Follow us on

मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) भारतात दुसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी बनण्याच्या दिशेने टाटा मोटर्सची (Tata Motors) आगेकुच सुरु आहे. टाटा मोटर्सने एप्रिल 2022 मध्ये, ऑटोमेकरने 41590 युनिट्‌सच्या विक्रीत तब्बल 66 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीची तुलना केल्यास 2021 मध्ये विकण्यात आलेल्या युनिट्‌सच्या तूलनेत ही वाढ जास्त आहे. दरम्यान, MoM च्या विक्री झालेल्या मार्च 2022 मध्ये विकण्यात आलेल्या 42295 युनिट्‌सच्या 2 टक्के लहानशी घसरण झालेली आहे. एप्रिल 2022 मध्ये विकण्यात आलेल्या 13471 युनिट्‌ससोबत टाटा नेक्सॉनने (Tata nexon) आपल्या सेल चार्टमध्ये चांगला लीड घेतलेला दिसून येत असून ही 2021 मध्ये विकण्यात आलेल्या 6938 युनिट्‌सच्या तुलनेत 94 टक्के वाढ नोंदली गेली होती.

1) टाटा नेक्सॉन : टाटा मोटर्सकडून नियमितपणे आपल्या सर्वाधिक मागणी असलेल्या टाटा नेक्सॉनला अपडेट केले जात आहे. लेटेस्ट अपडेटमध्ये नेक्सॉनला एक नवा रॉयल ब्लू कलर ऑप्शन, XZ+ (P), XZA+ (P), XZ+ (HS), आणि XZA+ (HS) हे चार नवीन व्हेरिएंट देण्यात आलेले आहे. नुकतेच नेक्सॉन ईव्ही मॅक्सला 18 लाखांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आले असून या कारला 437 किमी रेंजचा दावा करण्यात येत आहे.

2) टाटा पंच : टाटा पंच एप्रिल 2022 मध्ये 10132 युनिट्‌सच्या विक्रीसह दुसर्या क्रमांकावर राहिली. मार्च 2022 मध्ये विक्री झालेल्या 10525 युनिट्‌सच्या तुलनेत यात 4 टक्के MoM ची घसरण झालेली दिसून आली. या 5 सीटर हॅचबॅकमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. टाटा पंचची किंमत आता 582900 रुपयांपासून 948900 रुपयांपर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

3) टाटा टियागो : टियागोची विक्री एप्रिल 2021 मध्ये विकण्यात आलेल्या 6658 युनिट्‌सने 24 टक्के कमी होउन 5062 झाली आहे. मार्च 2022 मध्ये विकण्यात आलेल्या 4002 युनिट्‌सच्या तुलनेत MoM ची विक्री 26 टक्क्यांनी सुधारणा झालेली आहे. टाटा टियोगा आणि टिगोर या दोन्हींच्या किमतींमध्ये 12000 ते 15000 रुपयांची वाढ झालेली आहे.

4) टाटा अल्ट्रोज : या कारच्या विक्रीमध्ये 36 आणि 10 टक्के अशी घसरण झालेली दिसून येत आहे. गेल्या महिन्यात या कारची विक्री 4266 युनिट्‌स होती. मार्च 2022 मध्ये कंपनीने अल्ट्रोजची 4727 युनिट्‌सची विक्री केली होती. एप्रिल 2021 मध्ये विकण्यात आलेल्या 1627 युनिट्‌सपासून टिगोरची विक्री 134 टक्के वाढून 3803 युनिट्‌स झाली होती.

5) टाटा हॅरिअर : एप्रिल 2022 मध्ये विक्री 2785 युनिट्‌स होती. त्या आधी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये विकण्यात आलेल्या 1712 युनिट्‌सच्या तुलनेत यात 63 टक्के वाढ झालेली दिसून आली. मार्च 2022 मध्ये 2491 युनिट्‌सची विक्री करण्यात आली. एप्रिल 2021 मध्ये विकण्यात आलेल्या 1514 युनिट्‌सच्या 37 टक्के वृध्दी झालेली होती. MoM ची विक्री मार्च 2022 मध्ये विकण्यात आलेल्या 2227 युनिट्‌सच्या 7 टक़्के घसरण बघायला मिळाली