Tata Motors Mini Cargo : आता आला टाटा मोटर्सचा बॅटरीवर चालणारा छोटा हत्ती… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स काय आहेत…

| Updated on: May 06, 2022 | 12:34 PM

टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सने आज बॅटरी असलेला छोटा हत्ती लाँच केला आहे. हे कंपनीच्या सीव्ही पोर्टफोलियोमधील पहिले ईव्ही मॉडेल ठरले आहे. या लेखातून या वाहनाच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Tata Motors Mini Cargo : आता आला टाटा मोटर्सचा बॅटरीवर चालणारा छोटा हत्ती... जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स काय आहेत...
मिनी ट्रक कार्गो
Follow us on

मुंबई : ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) आज आपल्या लोकप्रिय मिनी ट्रक कार्गो वाहनाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीच्या या सेगमेंटमधील सीवी पोर्टफोलियातील हे पहिले ईव्ही मॉडेल ठरले आहे. कंपनीने फ्लिपकार्ट, अमेझॉन, बिग बास्केट, सिटी लिंक, डॉट, लेट्‌स ट्रांस्नपोर्ट, आणि येलो ईव्ही सारख्या विविध ई कॉमर्स (E-commerce) आणि लॉजिस्टीक्स कंपन्यांसोबत एक करार MoU वर स्वाक्षरी केली आहे. या ईव्हीच्या किमतीचे घोषणा पुढील तिमाहीत डिलिव्हरी सुरु झाल्यावर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. टाटा मोर्टसच्या म्हणण्यानुसार, या इलेक्ट्रिक वाहनाला (Electric Vehicle) ग्राहकांच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या वाहनाला पहिलेच 39 हजार युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे.

दरम्यान, ही गाडी संपूर्ण नव्या इव्होजन प्लेटफॉर्मवर आधारीत आहे. याला फ्लीट एज नावाच्या एका सिस्टीमसोबत तयार करण्यात आले आहे. इव्ही फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. कंपनीकडून 150 किमीच्या रेंजचा दावा करण्यात आला आहे. या गाडीची किंमत 4 लाख रुपयांपासून ते 5.5 लाखांपर्यंत आहे. ऐस ईव्हीची किंमत जवळपास 6.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

ही गाडी 21.3 kWh बॅटरी पॅकसोबत उपलब्ध असून ती 36 bhp आणि 130 Nm चा टार्क जनरेट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी कुलिंग सिस्टम आणि रिजनरेटीव्ह ब्रेकिंग सिस्टीमने उपलब्ध आहे. ऐस ईव्हीच्या केबिनमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि वायस रिकग्निशन आहे, जो हिंदी आणि इंग्रजी भाषेत रिप्लाय देतो. कंपनीच्या दाव्यानुसार, 2024 पर्यंत भारतात लास्ट माइल डिलिव्हरी उद्योग 6 ते 7 बिलियन डॉलरपर्यत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक बस सेगमेंटमध्ये पहिल्यापासूनच चांगली ग्राहकी मिळत आहे.

सीव्ही डिलरशिपजवळ ऐस ईव्हीसाठी वेगळा सेटअप असणार आहे. ऐसला पाहिल्यांदा 2005 मध्ये लाँच करण्यात आले होते. आणि आता 17 वर्षांनंतर, 23 लाखहून अधिक जास्त सेल झाल्यानंतर वाहनाला इलेक्ट्रिफाई करण्यात आले आहे. ऐस जवळ भारतातील छोटे कार्गो सेगमेंटमधील 70 टक्के बाजार हिस्सेदारी आहे. टाटा मोटर्सने पॅसेंजर व्हीकलसाठी सर्व नवीन इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरचे अनावरण केले आहे.