6.49 लाखात मिळतेय ही इलेक्ट्रिक कार, फीचर्स पाहून ग्राहकांची शोरुममध्ये गर्दी, 365 किमी रेंज अन् सनरूफ

6.49 लाख रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक कार. देते 365 किमी रेंज. त्यासोबत सनरुफ आणि जबरदस्त फीचर्स. ऑक्टोबर महिन्यात ठरली भारतातील सर्वात लोकप्रिय कार.

6.49 लाखात मिळतेय ही इलेक्ट्रिक कार, फीचर्स पाहून ग्राहकांची शोरुममध्ये गर्दी, 365 किमी रेंज अन् सनरूफ
| Updated on: Nov 02, 2026 | 5:50 PM

भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात Tata Motors ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. कंपनीची लोकप्रिय कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV Tata Punch EV ने ऑक्टोबर 2026 मध्ये मोठा विक्रम केला आहे. या कारच्या मासिक होलसेल डिस्पॅचने पहिल्यांदाच 5 हजार युनिट्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, एका महिन्यात 5 हजारांहून अधिक युनिट्सचा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली स्वतंत्र इलेक्ट्रिक कार ठरली आहे.

Tata Punch EV ला भारतीय बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Mahindra XEV 9S सारख्या नव्या इलेक्ट्रिक कारकडून स्पर्धा मिळत असतानाही Punch EV ने आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

Loading...

दोन बॅटरी पर्याय आणि 468 किमीपर्यंत रेंज

अपडेटेड Tata Punch EV दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 30kWh बॅटरी एका चार्जमध्ये 365 किलोमीटरपर्यंत ARAI प्रमाणित रेंज देते. 88bhp पॉवर आणि 154Nm टॉर्क. तर 40kWh बॅटरी ही एका चार्जमध्ये 468 किलोमीटरपर्यंत ARAI प्रमाणित रेंज देते. 129bhp पॉवर आणि 154Nm टॉर्क.

या कारमध्ये सिंगल-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. लॉन्ग रेंज व्हेरिएंट अवघ्या 9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकतो. या कारचा टॉप स्पीड 140 किमी प्रतितास आहे.

15 वर्षांची बॅटरी वॉरंटी हे मोठे आकर्षण

Tata Punch EV चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची बॅटरी वॉरंटी. 40kWh बॅटरी व्हेरिएंटवर पहिल्या वैयक्तिक मालकाला नोंदणीच्या तारखेपासून 15 वर्षांसाठी अनलिमिटेड किलोमीटरची बॅटरी वॉरंटी मिळते. तर 30kWh व्हेरिएंटवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली जाते.

किंमत किती?

Tata Punch EV ची एक्स-शोरूम किंमत 9.79 लाख रुपयांपासून सुरू होऊन 12.99 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये Smart, Smart+, Adventure, Empowered आणि Empowered+ S असे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे, कंपनीने या कारसाठी Battery-as-a-Service (BaaS) पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायांतर्गत कारची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये होते. मात्र, बॅटरी वापरासाठी प्रति किलोमीटर स्वतंत्र शुल्क भरावे लागते.

वेटिंग पीरियड 8 महिन्यांपर्यंत?

Punch EV ची वाढती मागणी पाहता काही शहरांमध्ये या कारसाठी 8 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र, वेटिंग पीरियड शहर, व्हेरिएंट, बॅटरी पर्याय आणि डीलरशिपमधील उपलब्ध स्टॉकनुसार बदलतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us