AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल जया बच्चन जे बोलून गेल्या ते कोणतीच सासू बोलणार नाही, थेट म्हटले, ती एक..

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे तोंड भरून काैतुक करताना जया बच्चन दिसल्या. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. ऐश्वर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.

ऐश्वर्या राय हिच्याबद्दल जया बच्चन जे बोलून गेल्या ते कोणतीच सासू बोलणार नाही, थेट म्हटले, ती एक..
Aishwarya Rai and Jaya Bachchan
| Updated on: Nov 02, 2026 | 5:53 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्याने नुकताच आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. बच्चन कुटुंबाची सून म्हणूनच तिची ओळख नाही तर तिची स्वत:ची वेगळी ओळख आहे. मिस वर्ल्डचा किताब तिच्या नावावर आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात ऐश्वर्याचे चाहते आहेत. जया बच्चन यांनी सून ऐश्वर्याबद्दल मोठे विधान केले. जया बच्चन यांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमात सून ऐश्वर्याबद्दल मोठे विधान केले. बच्चन कुटुंबात ऐश्वर्या कशी सामावून गेली, हे त्यांनी सांगितले. ऐश्वर्या रायबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, ऐश्वर्या खूप जास्त छान आहे. मला ती खूप आवडते. ती कधीच कुटुंबात आव आणून वागत नाही. ती शांतपणे ऐकून घेते. प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा तिचा गुण आहे. ती कोणासोबतही सहजपणे जुळून घेऊ शकते.

मला वाटते की, ऐश्वर्याच बच्चन कुटुंबाची ओळख आहे. ती योग्य निवड आहे. ती एक मोठी स्टार आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र येतो, त्यावेळी ती कधीच दाखवत नाही की, मी किती जास्त लोकप्रिय किंवा किती मोठी अभिनेत्री आहे. हाच तिचा स्वभाव मला आवडतो. काही सुरू असेल तर ती शांतपणे मागे उभी असते.

आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ती शांतपणे निरीक्षण करते. बच्चन कुटुंबात मिसळण्यासाठी तिला फार काही वेळ लागला नाही. जवळच्या लोकांसोबत कसे वागायचे हे तिला माहिती आहे. ऐश्वर्या हीच अभिषेक बच्चन याच्याकरिता योग्य पत्नी असल्याचेही मोठे विधान जया बच्चन यांनी यादरम्यान केले.

मुलगी श्वेता हिच्या लग्नानंतर घरात निर्माण झालेली मुलीची पोकळी ऐश्वर्याने भरून काढल्याचेही त्यांनी म्हटले. ज्यावेळी अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या राय हिला बघतात, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच असल्याचेही जया बच्चन यांनी म्हटले. ऐश्वर्या घरात दिसली की, मुलगी श्वेता घरात असल्याचे अमिताभ बच्चन यांना वाटते. बच्चन कुटुंबासोबत जलसा बंगल्यात ऐश्वर्या राय राहते.

Follow Us
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल