Tata Punch EV | टाटाने बाजारात खेळला डाव, टाटा पंच इलेक्ट्रिक कार खाणार भाव

| Updated on: Jan 17, 2024 | 11:27 AM

Tata Punch EV | टाटा पंचने लोकप्रियता मिळवली आहे. टाटाच्या नेक्सॉन आणि पंचची विक्री जोरदार आहे. आता टाटा पंच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पण सादर होत आहे. यामध्ये एलईडी हेडलँप, पॅडलशिफ्टर्ससह इतर अनेक बदल करण्यात आले आहे. यामध्ये 6 एयरबॅग पण देण्यात आले आहेत. काय आहे या कारची किंमत?

Tata Punch EV | टाटाने बाजारात खेळला डाव, टाटा पंच इलेक्ट्रिक कार खाणार भाव
Follow us on

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : Tata Punch EV आज बाजारात दाखल होत आहे. या कारची डिलिव्हरी पुढील काही आठवड्यात सुरु होईल. टाटा पंचने अगोदरच बाजारात लोकप्रियता मिळवली आहे. या कारवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. ही लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पण ही कार उतरवली आहे. 21,000 रुपयांमध्ये ही इलेक्ट्रिक मायक्रो एसयुव्ही बुक करता येते. या नवीन पंचमध्ये एलईडी हेडलँप, पॅडलशिफ्टर्ससह इतर अनेक फीचर देण्यात आले आहेत. कारमध्ये 6 एयरबॅग पण देण्यात आले आहेत. या कारची किती आहे किंमत?

पॉवरट्रेन

पंच ईव्ही मॉडेल रेंजमध्ये चार वेगवेगळे ट्रिम आहेत. स्मार्ट, एडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड+.ही एसयुव्ही दोन बॅटरी पॅक स्टँडर्ड रेंज आणि लाँग रेंजमध्ये उपलब्ध आहे. ताज्या माहितीनुसार, या कारमध्ये स्टँडर्ड रेंजमध्ये 25kWh बॅटरी पॅक मिळेल. तो 82PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये जवळपास 315 किमीची रेंज मिळेल. तर लाँग रेंज व्हेरिएंटमध्ये 35kWh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 400 किमी रेंजसह 122PS आणि 190Nm चे आऊटपुट जेनरेट करेल.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फीचर्स

  1. या कारमध्ये एलईडी हेडलँप, पॅडलशिफ्टर्ससह मल्टी-मोड रीजन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम आणि 6 एयरबॅग सुरक्षेसाठी देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्मार्ट, एडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड+ या रेंजनुसार बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे.
  2. एडव्हेंचर ट्रिममध्ये ग्राहकांना हरमनचे 7-इंच इंफोटेनमेंट सिस्टिम, एप्पल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो कनेक्टिव्हिटी, ऑटोहोल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एक ज्वेल्ड गिअर कंट्रोल नॉब, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लँप आणि एक ऑप्शनल सनरूफ देण्यात आले आहे.
  3. एम्पावर्ड ट्रिममध्ये 7-इंच डिजिटल ड्रायवर डिस्प्ले, 10.25-इंचची मोठी इंफोटेनमेंट सिस्टम, AQI डिस्प्लेसह एक एअर प्युरिफायर, SOS फंक्शन, ऑटो-फोल्डिंग ORVMs, 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि ड्युअल टोन कलर पर्याय, एक वायरलेस स्मार्टफोन चार्जर, व्हेटिलेटेड फ्रंट सीट्स, एक 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत तरी काय

स्मार्ट व्हेरिएंट प्रिस्टीन व्हाईट शेडमध्ये पण कार उपलब्ध, पंच ईव्ही मॉडेल रेंजमध्ये चार वेगवेगळे ट्रिम आहेत. स्मार्ट, एडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड+ या विविध रंग संगतीत उपलब्ध आहे. टाटा पंच ईव्हीची किंमत दहा लाखापासून सुरु होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही किंमत 13 लाख रुपयांपर्यंत विविध मॉडेल्ससाठी असू शकेल. यासंबंधीची माहिती नजीकच्या डिलरकडे मिळेल.