AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Tiago NRG : टियागो एनआरजी XT लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

वीन टियागो एनआरजी एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये नवीन 14 इंच हायपरस्‍टाइल व्‍हील्‍स, हर्मनTM द्वारे 3.5 इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम आणि इतर फीचर्स आहेत. 181 मिमीचे हाय फीग्राऊण्‍ड क्‍लीअरन्‍स, रूफ रेल्‍स, ब्‍लॅक इंटीरिअर्स आहे.

Tata Tiago NRG : टियागो एनआरजी XT लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या...
टियागो एनआरजी XTImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 05, 2022 | 6:01 AM
Share

नवी दिल्ली :  आपले न्‍यू फॉरेव्‍हर तत्त्व कायम राखत आणि टियागो एनआरजीचा (Tata Tiago NRG) पहिला वर्धापन दिन साजरा करत टाटा मोटर्स (TATA Motor) या भारतातील अग्रणी ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने 6.42 लाख रूपयांमध्‍ये टियागो एनआरजी एक्‍सटी व्‍हेरिएण्‍ट लाँच केली. टियागो एनआरजीला लाँच केल्‍यापासून ग्राहकांकडून अद्भुत प्रतिसाद मिळाला आहे. टियागो पेट्रोल (Petrol) विक्रीमध्‍ये 15 टक्‍क्‍यांचे योगदान देणा-या या वेईकलची एसयूव्‍हीइश डिझाइन, रस्‍त्‍यावरील खडतर क्षमता, तसेच विभागातील सर्वोत्तम सुरक्षितता रेटिंग (जीएनसीएपीकडून ४ स्‍टार)साठी प्रशंसा करण्‍यात आली आहे. या नवीन व्‍हेरिएण्‍टसह टियागो एनआरजी आता दोन ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल – टियागो एक्‍सटी एनआरजी आणि टियागो एक्‍सझेड एनआरजी.  नवीन टियागो एनआरजी एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टमध्‍ये नवीन १४ इंच हायपरस्‍टाइल व्‍हील्‍स, हर्मनTM द्वारे 3.5 इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्‍स, हाइट अ‍ॅडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट, फ्रण्‍ट फॉग लॅम्‍प्‍स आणि इतर अनेक वैशिष्‍ट्यांसोबत एनआरजी डिझाइन घटक जसे 181 मिमीचे हाय ग्राऊण्‍ड क्‍लीअरन्‍स, शक्तिशाली क्‍लॅडिंग्‍ज, इन्फिनिटी ब्‍लॅक रूफसह रूफ रेल्‍स आणि चारकोल ब्‍लॅक इंटीरिअर्स आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे सेल्‍स, मार्केटिंग व कस्‍टमर केअरचे उपाध्‍यक्ष राजन अम्‍बा म्‍हणाले, ”टियागो एनआरजी लाँच केल्‍यापासून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आली आहे आणि पसंतीची हॅचबॅक बनली आहे, जी साहसी राइडर्सना, तसेच मनसोक्‍त जीवनाचा आनंद घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांना खडतर प्रदेशामध्‍ये देखील आरामदायी कार्यक्षमतेची खात्री देते. यंदा सणासुदीचा काळ उत्‍साहात सुरू करत आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांसाठी टियागो एक्‍सटी एनआरजी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. आकर्षक किंमत असलेली ही व्‍हेरिएण्‍ट उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे आणि तिचा ड्राइव्‍ह अनुभव वाढवण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, या वैशिष्‍ट्य संपन्‍न एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टची भर एनआरजीला आणि एकूण टियागो पोर्टफोलिओला अधिक प्रबळ करेल, ज्‍यामधून त्‍यांच्‍या आगामी विक्रीला चालना मिळेल.”

या साजरीकरणामध्‍ये अधिक भर करत टाटा मोटर्सने नवीन वैशिष्‍ट्यांच्‍या भरीसह विद्यमान टियागो एक्‍सटी व्‍हेरिएण्‍टच्‍या अपग्रेडेशनची घोषणा केली, ज्‍यामुळे ही वेईकल अधिक आकर्षक बनली आहे. यामध्‍ये 14 इंच हायपरस्‍टाइल व्‍हील्‍स, हाइट अॅडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट, रिअर पार्सल शेल्‍फ अशा इतर अनेक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. ही वैशिष्‍ट्ये एक्‍स्‍टी श्रेणीसह टियागो एक्‍सटी, एक्‍सटी4ए व एक्‍सटी आयसीएनजीमध्‍ये उपलब्‍ध असतील. कंपनीने टियागो एक्‍स्‍टी पेट्रोल व्‍हेरिएण्‍टसाठी पर्यायी रिदम पॅक देखील सादर केला आहे, ज्‍यामध्‍ये 7 इंच टचस्क्रिन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि 4 ट्विटर्सचा समावेश आहे. नवीन एक्‍सटी ट्रिमसाठी 30, 000 रूपये अतिरिक्‍त खर्च करत रिदम पॅकचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच नवीन एक्‍सटी ट्रिम मिडनाइट प्‍लम कलरसह विद्यमान ओपल व्‍हाइट, डेटोना ग्रे, अरिझोना ब्‍ल्‍यू आणि फ्लेम रेड कलर पर्यायांमध्‍ये येते

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?