जगातील सर्वात वेगवान कार बाजारात, 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 300 KM रेंज, सुरक्षेच्या बाबतीत दमदार

| Updated on: Jun 12, 2021 | 6:42 PM

टेस्ला मॉडेल एस प्लेड (Tesla Model S Plaid) ही जगातील सर्वात वेगवान कार असल्याचा दावा केला जात आहे. ही कार अमेरिकेत अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे.

जगातील सर्वात वेगवान कार बाजारात, 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 300 KM रेंज, सुरक्षेच्या बाबतीत दमदार
Tesla Model S Plaid
Follow us on

मुंबई : टेस्ला मॉडेल एस प्लेड (Tesla Model S Plaid) ही जगातील सर्वात वेगवान कार असल्याचा दावा केला जात आहे. ही कार अमेरिकेत अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क स्वत: ही कार चालवत घेऊन आले आणि त्यांनी ही कार सादर केली. ही कार मॉडेल एस सेडानची परफॉरमन्स आवृत्ती आहे. (Tesla Model S Plaid Launch in US, 300 KM range on 15 minutes of charging)

टेस्ला मॉडेल S Plaid ही कार 129,990 डॉलर्स इतक्या किंमतीत लाँच केली आहे. ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर या कारची किंमत सुमारे 95 लाखांपर्यंत आहे. आधी या गाडीची किंमत 119,990 डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र 24 तासांच्या आतच वाहनाची किंमत वाढविण्यात आली.

मस्क यांनी जाहीर केले आहे की इलेक्ट्रिक फोर-डोर टेस्ला मॉडेल एस प्लेडची (S Plaid) डिलिव्हरी आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही कार आधी 3 जून रोजी लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पुरवठ्याच्या मुद्द्यांमुळे लाँचिंग डेट (तारीख) पुढे ढकलण्यात आली.

S Plaid चे फीचर्स

टेस्ला मॉडेल एस प्लेड (S Plaid) या कारमध्ये 1020 हॉर्स पॉवर क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे, जे केवळ 2 सेकंदात 0 ते 60mph पर्यंतचं स्पीड घेऊ शकते. म्हणजेच ही कार पोर्शेपेक्षा वेगवान आहे. तसेच ही कार व्होल्वोपेक्षा सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. टेस्लाच्या या मॉडेलची टॉप स्पीड 200mph (321 किमी प्रतितास) इतकी आहे.

दरम्यान, टेस्लाने येथे स्पष्ट केले आहे की, वाहनात योग्य चाके आणि टायर बसविल्यासच ही कार टॉप स्पीडला स्पर्श करु शकते. टेस्ला मॉडेल एस प्लेडमध्ये 19 इंचांची चाके बसवण्यात आली आहेत, परंतु ग्राहक यामध्ये 21 इंचाची चाकेदेखील वापरु शकतात. परंतु, मोठे टायर लावल्यास वाहनाचा वेग कमी होऊ शकतो.

टेस्लाने म्हटलं आहे की, मॉडेल एस प्लेड कारमधील बॅटरी 15 मिनिटं चार्ज केल्यानंतर तब्बल 300 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. परंतु यासाठी ग्राहकांना सुपरचार्जरचा वापर करावा लागेल. एलन मस्क यांनी म्हटलं आहे की, मॉडेल S Plaid कार फास्ट चार्ज केली जाऊ शकते. तसेच 25,000 स्टेशन्सवर सुपरचार्जर्स बसवण्यात आले आहेत.

फास्ट चार्जिंग

एलन मस्क यांनी असेही म्हटले आहे की, ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. Model S Plaid टेस्लाच्या सर्वात विस्तृत श्रेणीचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. या कारची ड्रायव्हिंग रेंज 520 मैल म्हणजेच 836 किमी इतकी आहे. मागील वर्षी ही कार एका बॅटरी इव्हेंटमध्ये सादर करण्यात आली होती. मस्क यांनी म्हटले होते की, यात टेस्लाची नेक्स्ट जेनरेशन 4680 बॅटरी सेल दिली जाईल, परंतु त्याचं उत्पादन 2021 च्या अखेरीसच्या ऐवजी 2022 मध्ये केलं जाईल.

सिंगल चार्जमध्ये 627 किलोमीटर रेंज

टेस्लाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मॉडेल एस प्लेडला (Model S Plaid) 0 ते 60 मैल (96 किलोमीटर) इतका स्पीड घेण्यासाठी केवळ 1.99 सेकंद लागतात. म्हणजेच अवघ्या 2 सेकंदात ही कार तब्बल 96 किमी/प्रतितास इतक्या वेगाने धावते. ही कार जास्तीत जास्त 200 मैल प्रतितास (321 किमी) इतक्या वेगाने धावते. या कारची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 390 मैल (627 किलोमीटर) इतकी रेंज देते.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

(Tesla Model S Plaid Launch in US, 300 KM range on 15 minutes of charging)