जगातील सर्वात वेगवान कार बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास, सिंगल चार्जमध्ये 627 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज

टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार मॉडेल एस प्लेड (Model S Plaid) लाँच करण्याची घोषणा केली आहे.

जगातील सर्वात वेगवान कार बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास, सिंगल चार्जमध्ये 627 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज
Tesla Model S Plaid

मुंबई : टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार मॉडेल एस प्लेड (Model S Plaid) लाँच करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. मॉडेल एस प्लेडच्या लॉन्चिंगविषयी माहिती देताना एलन मस्क म्हणाले की, या कारचा डिलिव्हरी इव्हेंट 10 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता (पॅसिफिक टाइम) लाईव्ह केला जाईल. (Elon musk announces Tesla Model S Plaid going to launch on june 10)

एलन मस्क यांनी सोमवारी सांगितले होते की, टेस्ला इंकचr लॉन्गेस्ट रेंजवाली Model S Plaid+ ही कार रद्द करण्यात आली आहे. मस्क यांनी ट्विट केले होते की, Plaid+ is canceled. No need, as Plaid is just so good. म्हणजेच Plaid+ रद्द झाली आहे. आपल्याला त्याची गरज नाही, कारण मुळात Plaid हीच कार खूप दमदार आहे.

एलन मस्क यांनी असेही म्हटले आहे की, ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. Model S Plaid टेस्लाच्या सर्वात विस्तृत श्रेणीचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. या कारची ड्रायव्हिंग रेंज 520 मैल म्हणजेच 836 किमी इतकी आहे. मागील वर्षी ही कार एका बॅटरी इव्हेंटमध्ये सादर करण्यात आली होती. मस्क यांनी म्हटले होते की, यात टेस्लाची नेक्स्ट जेनरेशन 4680 बॅटरी सेल दिली जाईल, परंतु त्याचं उत्पादन 2021 च्या अखेरीसच्या ऐवजी 2022 मध्ये केलं जाईल.

सिंगल चार्जमध्ये 627 किलोमीटर रेंज

टेस्लाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मॉडेल एस प्लेडला (Model S Plaid) 0 ते 60 मैल (96 किलोमीटर) इतका स्पीड घेण्यासाठी केवळ 1.99 सेकंद लागतात. म्हणजेच अवघ्या 2 सेकंदात ही कार तब्बल 96 किमी/प्रतितास इतक्या वेगाने धावते. ही कार जास्तीत जास्त 200 मैल प्रतितास (321 किमी) इतक्या वेगाने धावते. या कारची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 390 मैल (627 किलोमीटर) इतकी रेंज देते.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

सिंगल चार्जमध्ये 70 ते 100 किमी धावेल ही सायकल, जाणून घ्या याचे खास फिचर्स

(Elon musk announces Tesla Model S Plaid going to launch on june 10)