670 शुगर लेवल आणि अचानक आला हार्ट ॲटॅक ! TESLA कारने असा वाचवला जीव…

अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लाच्या कारच्या ऑटोनॉमस टेक्नोलॉजीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. याच टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीमुळे एक इसमाचा जीव वाचल्याची अद्भुत घटना घडली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली

670 शुगर लेवल आणि अचानक आला हार्ट ॲटॅक ! TESLA कारने असा वाचवला जीव...
| Updated on: Apr 12, 2024 | 3:19 PM

अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्लाच्या कारच्या ऑटोनॉमस टेक्नोलॉजीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. याच टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीमुळे एक इसमाचा जीव वाचल्याची अद्भुत घटना घडली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे आणि ते म्हणाले, “टेस्ला कारची सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी त्यावेळी तुमच्या मदतीसाठी उपलब्ध होती याचा मला आनंद आहे” असे त्यांनी नमूद केले.

नक्की काय झालं ?

‘X’ (पूर्वीच ट्विटर) या सोशल नेटवर्किंग साईटवर मॅक्सपॉल फ्रँकलिन या इसमाने त्याला आलेला थरारक अनुभव सांगितला. ‘ 1 एप्रिल रोजी, टेस्लाने संपूर्ण यूएस मधील त्यांच्या कारमध्ये फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (Full Self-Driving) फंक्शन अनलॉक केले. त्या दिवशी, पहाटे 2 च्या सुमारास, मला डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटतं होतं. आणि इन्सुलिन पंपमध्ये काही बिघाड झाल्यामुळे, माझी ग्लुकोज पातळी 670 वर पोहोचल्याचं माझ्या लक्षात आलं.

जराही वेळ न घालवता मी Tesla Model Y कारमध्ये जाऊन बसलो. त्यानंतर मी स्टिअरिंग व्हीलवर फक्त दोन वेळा टॅप केले( टकटक केली)  आणि फुल सेल्फ- ड्रायव्हिंग फंक्शन ऑन केलं. त्यानंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय कारने मी थोड्याच वेळात 20 किमी अंतरावर असलेल्या इमर्जन्सी रूममध्ये पोहोचलो. एवढंच नाही तर ही कारने पार्किंगंही ( स्वत:चे स्वत:) केले. ज्यामुळे मला तत्काळ उपचार मिळू शकले’ असे मॅक्सपॉल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले.

Elon Musk काय म्हणाला ?

मॅक्सपॉल याच्या या पोस्टवर टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यावेळी Tesla FSD (फुल्ल सेल्फ-ड्रायव्हिंग) तिथे मदतीसाठी उपलब्ध होती आणि आता तुमची प्रकृती बरी आहे, हे वाचून मला बरं वाटलं, असं मस्क यांनी नमूद केलं.