Electric Car : 50 वर्षांहून अधिक काळ स्टेटस सिंबॉल असलेल्या ‘या’ कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन होणार लाँच

| Updated on: May 28, 2022 | 10:50 AM

पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्री, कलेक्टर तर अगदी सामान्य माणूसदेखील अ‍ॅम्बेसेडरमधून फिरत असे. इतक्या वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रात राज्य केलेली सुपर डूपर हीट अ‍ॅम्बेसेडर आता आपल्याला पुन्हा नव्या रुपात बघायला मिळणार आहे. हिंदूस्तान अ‍ॅम्बेसेडर 2.0 ला लवकरच नवीन अवतारात लाँच करणार आहे.

Electric Car : 50 वर्षांहून अधिक काळ स्टेटस सिंबॉल असलेल्या ‘या’ कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन होणार लाँच
Ambassador Car
Follow us on

मुंबई : अ‍ॅम्बेसेडरचा (Ambassador) तो रुबाब अजून विसरला नाहीत नाही? तब्बल पाच तप म्हणजे 50 वर्षांहून अधिकचा काळ अ‍ॅम्बेसेडरने गाजवला. ज्यावेळी अ‍ॅम्बेसेडर दारासमोर असणे हा स्टेटस सिंबॉलचा एक भाग समजला जात होता त्या काळी प्रत्येकाला ही कार हवीहवीशी वाटत होती. अगदी पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्री, कलेक्टर तर अगदी सामान्य माणूसदेखील अ‍ॅम्बेसेडरमधून फिरत असे. इतक्या वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रात राज्य केलेली सुपर डूपर हीट अ‍ॅम्बेसेडर आता आपल्याला पुन्हा नव्या अवतारात बघायला मिळणार आहे. हिंदूस्तान अ‍ॅम्बेसेडर 2.0 ला (Hindustan Ambassador 2.0) लवकरच नवीन अवतारात लाँच करण्यात येणार आहे. हिंदुस्तान मोटर्सने (Hindustan Motors) या कारची निर्मिती केली होती. हिंदुस्तान अ‍ॅम्बेसेडर भारताची एक क्लासिक कार मानली हात होती. ही भारतात बनविण्यात आलेल्या पहिल्या कार्सपेकी एक होती.

हिंदुस्तान मोटर्सने 1958 साली अ‍ॅम्बेसेडर कारच्या प्रोडक्शनला सुरुवात केली होती. अ‍ॅम्बेसेडर ब्रिटिश कार निर्माता मोरिस ओक्सफोर्ड सिरीज 3 वर आधारीत आहे. काहीच दिवसांमध्ये ही कार भारतीय लोकांमध्ये एक स्टेटस्‌ सिंबॉलचा भाग बनली होती. भारतीय बाजारामध्ये या कारने 50 वर्षांपर्यंत शब्दश: एकहाती राज्य केले आहे. नंतर कमी मागणी आणि नुकसानीमुळे 2014 साली या कंपनीने देशातील आपला बिस्तार आवरता घेतला. या कारला तब्बल सात जनरेशनमध्ये अपडेट करण्यात आले होते. आता ही कार पुन्हा ग्राहकांना नव्या रुपात भेटीला येणार आहे.

डिझाईनपासून इंजिनमध्ये बदल

या वेळी कारच्या डिझाईनपासून ते इंजिनपर्यंत अनेक बदल करण्यात येतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नवीन अ‍ॅम्बेसेडरला भारतात पुढील दोन वर्षांच्या आत लाँच करण्यात येईल, अशी आशा व्यक्त होत आहे. एका माहितीनुसार, हिंद मोटर फायनँशियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एचएमएफसीआयने नवीन कार बनविण्यासाठी फ्रेंच कार निर्माता प्यूजोसोबत करार केला आहे. आता हे दोन्ही नवीन ब्रेंड मिळून अ‍ॅम्बेसेडरच्या डिझाईन, इंजिन आणि इंटीरिअरवर काम करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

चेन्नई प्लांटमध्ये निर्मिती

विशेष म्हणजे नवीन अ‍ॅम्बेसेडरची निर्मिती हिंदुस्तान मोटर्सच्या चेन्नई प्लांटमध्ये केली जाणार आहे. या प्लांटमध्ये एचएमएफसीआयअंतर्गत काम करण्यात येणार आहे. यात सिके बिडला ग्रुपदेखील जोडला गेला आहे. हिंदुस्तान मोटरचे डायरेक्टर उत्तम बोस यांनी सांगितले, की अ‍ॅम्बेसेडर 2.0 कार ला नवीन रुपात ग्राहकांच्या भेटीला आणण्याचे काम सुरु आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. या कारचे नवीन डिझाईन, मेकेनिकल काम मोठ्या प्रमाणात झाले आहे.