जगातल्या पहिल्या रडार टेक्नॉलॉजीच्या ई-बाईक क्रेझ वाढली, 24 तासात इतक्या बाईकची बुकींग

Ultraviolette X-47 Crossover या बाईकचा बुकींग रेकॉर्ड सांगतो की भारतीय दुचाकी ग्राहकांना आता हायटेक आणि इनोव्हेटिव्ह EVs आवडू लागल्या आहेत, रडार टेक, मजबूत बॅटरी आणि आधुनिक सेफ्टी फिचर्स आणि दमदार डिझाईनमुळे या बाईकला लाँचिंग आधीच बेस्टसेलर बनवले आहे.

जगातल्या पहिल्या रडार टेक्नॉलॉजीच्या ई-बाईक क्रेझ वाढली, 24 तासात इतक्या बाईकची बुकींग
Ultraviolette X-47 Crossover
| Updated on: Sep 25, 2025 | 6:44 PM

भारतीय बाजारात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अल्ट्राव्हॉयलेटची नवीन बाईक (Ultraviolette X-47 Crossover) हे आहे. लाँच झाल्यानंतर केवळ २४ तासांच्या आत या हाय टेक इलेक्ट्रीक बाईकची तीन हजाराहून जास्त बुकींग झाली आहे. एवढेच नाही कंपनीने ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून आपली प्रारंभीची ऑफर आणखीन वाढवली आहे. आता सुरुवातीचे पाच हजार ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊ शकतील. चला तर पाहूयात या बाईकची काय आहे खासीयत…

फ्यूचरिस्टिक आणि दमदार कामगिरी

Ultraviolette कंपनीने आपल्या कटींग एज टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेटीव्ह डिझाईनसाठी ओळखली जाते. या बाईकला “फायटर जेट डीएनए” सह डिझाईन केले आहे. यामुळे ही बाईक केवळ दिसायलाच फ्युचरिस्टीक नसून रस्त्यावर देखील तेवढात दमदार परफॉर्मेन्स देते.

जगातील पहिली रडार आणि कॅमेरा इंटीग्रेटेड बाईक

X-47 क्रॉसओव्हरला खास बनवणारी गोष्ट ही आहे की ही जगातील पहिली बाईक आहे ज्यात रडार आणि कॅमेरा इंटिग्रेशन दिलेले आहे. हे फिचर आतापर्यंत केवळ लक्झरी कारमध्ये पाहायला मिळत होते. याचा फायदा हा होणार की रायडरला प्रत्येक स्थिती चांगली सेफ्टी मिळणार आहे.या बाईकमध्ये या सग ड्युअल कॅमेरा डॅशकॅम आणि रडार-पॉवर्ड सेफ्टी सिस्टीम देखील सामील आहे.

सेफ्टी आणि रायडिंग एक्सपीरियन्सवर जोर

या ई-बाईक्समध्ये 10 वी झेन बोस ड्यु्अल-चॅनल ABS, ब्रेम्बो ब्रेक्स आणि 3 लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. याशिवाय सुव्ह सारखा स्टान्स आणि ऑल टेरेन टायर्स राईडला आणखी एडव्हेंरस बनवते.

सस्पेंशनसाठी 41mm फ्रंट फॉर्क्स आणि रिअरमध्ये मोनो-शॉक एडजस्टेबल सेटअप दिलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रोड स्थितीत ही बाईक स्मूद रायडिंग एक्सपिरियन्स देते. या बाईक मध्ये तु्म्हाला तीन रायडिंग मोड्स Glide, Combat आणि Ballistic देण्यात आले आहे. यात रायडर त्याच्या गरजेनुसार कोणत्याही स्विचमध्ये ही बाईक चालवू शकतो.

टेक्नोलॉजीने परिपूर्ण फीचर्स

Ultraviolette X-47 Crossover मध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले आणि स्मार्ट कंट्रोल्स मिळतात. यात टाईप-C चार्जिंग सपोर्ट, व्हायरलेस कनेक्टीव्हिटी आणि स्मार्टफोन इंटीग्रेशन सारखे फिचर्स मिळतात.

किंमत आणि डिलीव्हरी

Ultraviolette X-47 Crossover बाईकची  सुरुवातीची किंमत 2.49 लाख रुपये ( एक्स – शोरुम ) ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत बेवसाईटवर केवळ 999 रुपये भरून बुकींग करता येणार आहे. ग्लोबल डिलिव्हरी साल 2026 पासून सुरु होत आहे.