AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरो डेस्टीनी 110 लाँच, फॅमिलीसाठी नवी स्कुटर बाजारात, स्टाईल-कम्पर्ट यांचा कॉम्बो,किंमत किती?

Hero Destini 110 एक अशा स्कूटरचे पॅकेज आहे यात मायलेज, कम्फर्ट, सेफ्टी आणि स्टाईल सर्वाचा सुंदर मिलाफ केला आहे. ही स्कूटर फॅमिली रायडर्स आणि दैनंदिन गरजांपाहून खास डिझाईन केली आहे.

हिरो डेस्टीनी 110 लाँच, फॅमिलीसाठी नवी स्कुटर बाजारात, स्टाईल-कम्पर्ट यांचा कॉम्बो,किंमत किती?
Hero Destini 110 Scooter
| Updated on: Sep 23, 2025 | 9:40 PM
Share

Hero Destini 110 Scooter: भारताची सर्वात मोठ्या दुचाकी निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या Hero MotoCorp ने आपल्या स्कूटर पोर्टफोलियोत एक नवीन मॉडेल जोडले आहे. कंपनीने आपली नवीन फॅमिली दुचाकी Destini 110 ला लाँच केले आहे. ही स्कूटर खास फॅमिलीसाठी तयार केली आहे. फॅमिली युजर्स, वर्कींग प्रोफेशनल्स आणि फर्स्ट टाईम स्कूटर बायर्स यांना लक्षात घेऊन या स्कूटरचे डिझाईन केले आहे.

या स्कूटरची किंमत ७२,००० रुपये (VX ड्रम) पासून सुरु होऊन ७९,००० रुपये (ZX डिस्क) पर्यंत आहे ( एक्स शोरुम दिल्ली )

दमदार इंजिन आणि शानदार मायलेज

Destini 110 मध्ये 110cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे ७,२५० rpm वर 8 bhp पॉवर आणि ८.८७ Nm टॉर्क जनरेट करते. यात कंपनीचे i3s (Idle Stop-Start System) तंत्रज्ञान आणि वन-वे क्लचचा समावेश आहे. Hero च्या दाव्यानुसार ही स्कूटर ५६.२ kmplचा मायलेज देते. जे या सेगमेंटमध्ये सर्वात चांगले आहे.

स्टायलिश डिझाईन आणि रेट्रो टच

डिझाईनच्या बाबतीत Destini 110ला एक नियो-रेट्रो लूक देण्यात आला आहे. यात क्रोम एक्सेंट, प्रोजेक्टर LED हेडलँप आणि ब्रँडचा सिग्नेचर H-शेप्ड LED टेललँप देण्यात आला आहे. याचा लूक असा तयार केला आहे की ही स्कूटर यंग रायडर्सना आणि फॅमिली दोघांना आकर्षित करेल.

कम्पर्ट आणि कन्व्हीनियन्स फिचर्स

या स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वात लांबीच्या 785mm सीटची सुविधा दिली आहे. या इंटीग्रेटेड बॅकरेटस्ट देखील आहे. यात स्पेशस लेगरुम आणि रुंद प्लॅटफॉर्म दिलेला आहे, जो १२ इंच व्हील्सवर चालतो. सोयीसाठी यात फ्रंट ग्लव्ह बॉक्स, बुट लँप आणि एनालॉग-डिजिटल स्पीडोमीटर दिला आहे. तसेच सेफ्टीसाठी यात १९०mm फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

जास्त टिकाऊ आणि मजबूत बॉडी

Destini 110 मध्ये मजबूतीवर खास लक्ष दिले आहे. यात तीन मोठे मेटल बॉडी पॅनल्स आहेत.त्यामुळे हीचे आयुष्य दीर्घ झाले असून जे हिला जास्त स्टर्डी बनवतात.

कलरचे पर्याय काय ?

हिरोने या स्कूटरला एकूण ५ रंगात लाँच केले आहे.

VX व्हेरिएंट: Eternal White, Matt Steel Grey आणि Nexus Blue

ZX व्हेरिएंट: Aqua Grey, Nexus Blue आणि Groovy Red

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.