AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST कपातीचा उचला फायदा, Activa ला टक्कर देणारी ही स्कूटर झाली इतकी स्वस्त

GST कपातीमुळे Suzuki Access आणि Honda Activa सारख्या प्रसिद्ध स्कूटर्स देखील स्वस्त झाल्या आहेत. या दोन्ही स्कूटरपैकी सर्वात स्वस्त कोणती आणि मायलेज कोणते चांगली देते सर्वकाही एकाच ठिकाणी वाचा...

GST कपातीचा उचला फायदा, Activa ला टक्कर देणारी ही स्कूटर झाली इतकी स्वस्त
scooter rate
| Updated on: Sep 23, 2025 | 4:39 PM
Share

जीएसटीचे नवे दर सोमवार २२ सप्टेंबरपासून देशभर लागू झाले आहेत. कंपनीने जीएसटी दरात कपात करुन ग्राहकांना मोठा लाभ आहेत. जर तुम्ही नवी स्कूटर खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर होंडा एक्टीवाला स्पर्धा करणाऱ्या प्रसिद्ध स्कूटर Access च्या दरात जीएसटी कपातीनंतर किती दर कमी झाले आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच होंडा कंपनीची प्रसिद्ध स्कूटर Honda Activa किती स्वस्त झाली आहे हे देखील आपण पाहणार आहोत.

GST 2.0 Rate Cut: Suzuki Access झाली इतकी स्वस्त

होंडा एक्टिव्हाला टक्कर देणारी सुझुकी कंपनीची ही स्कूटर 8 हजार 523 रुपये स्वस्त झाली आहे. या स्कूटरची किंमत आता 77 हजार 284 रुपये (एक्स शोरूम) ते 93 हजार 877 रुपए (एक्स शोरूम) पर्यंत झाली आहे. या स्कूटरमध्ये कलर टीएफटी डिजिटल कन्सोल, नेव्हीगेशन, लास्ट पार्किंग लोकेशनची माहिती, इनकमिंग कॉलर आयडी, व्हॉट्सअप कॉल आणि मॅसेजचे नोटीफिकेशन सर्वकाही या स्कूटरच्या डिस्प्लेवरच मिळते.

GST Cut: Honda Activa इतकी झाली स्वस्त

जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर होंडाची प्रसिद्ध स्कूटर एक्टीव्हा 110 सीसी आणि 125 सीसी मॉडेलची किंमत कमी झाली आहे. 110 सीसी वाले मॉडेल 7 हजार 874 रुपये तर 125 सीसी वाले मॉडेल 8 हजार 259 रुपये स्वस्त झाली आहे.

होंडा एक्टीवाच्या 110 सीसी वाले स्कूटरची किंमत 74,369 रुपये (एक्स शोरूम) आणि 84,021 रुपये (एक्स शोरूम) आहे. तर 125 सीसी वाल्या स्कूटरची किंमत 88,339 रुपये आणि 91,983 रुपयांपर्यंत झाली आहे. होंडा एक्टीव्हा स्मार्ट चावी आणि एच स्मार्ट टेक्नॉलॉजीसह टीएफटी स्क्रीन, फोन चार्जिंगसाठी 15 वॉट यूएसबी टाईप सी पोर्ट,फ्रंट आणि रिअर अलॉय व्हील, आयडल स्टॉप सिस्टीमसह मळते.

Suzuki Access Mileage vs Honda Activa Mileage

होंडा एक्टीव्हा 110 सीसी वाले 6 जी मॉडेल एका लिटरला 59.5 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देते आणि 125 सीसी वाले मॉडेल एक लिटरमध्ये 47 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.तर सुझुकी स्कूटरचा विचार करता ही स्कूटर एका लिटरमध्ये 45 किलोमीटरपर्यंतचा मायलेजची ऑफर करते.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.