Vespa LX स्कूटर अवघ्या 30 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार ऑफर

| Updated on: Nov 10, 2021 | 8:14 AM

भारतीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर दररोज गगनाला भिडत आहेत आणि अशा स्थितीत महागड्या पेट्रोल स्कूटरने लोकांचा खिसाही कापला जात आहे. अशा स्थितीत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजरात आणत आहेत. मात्र, जास्त किंमतीमुळे अनेकांची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची इच्छा अपुरी राहत आहे.

Vespa LX स्कूटर अवघ्या 30 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार ऑफर
Vespa LX स्कूटर.
Follow us on

मुंबई : भारतीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर दररोज गगनाला भिडत आहेत आणि अशा स्थितीत महागड्या पेट्रोल स्कूटरने लोकांचा खिसाही कापला जात आहे. अशा स्थितीत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजरात आणत आहेत. मात्र, जास्त किंमतीमुळे अनेकांची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची इच्छा अपुरी राहत आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कूटरबद्दल सांगणार आहोत, जी अवघ्या 30 हजार रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ही स्कूटर अनेक चांगल्या फीचर्स आणि वेगवेगळ्या कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. (Vespa LX Scooter for only 30 thousand rupees, know where to get great offer)

‘Vespa LX’ नावाची स्कूटर ‘Bike24’ नावाच्या वेबसाईटवर लिस्टेड आहे, जी सध्या पिवळ्या रंगात उपलब्ध आहे आणि इतर स्कूटर्सपेक्षा थोडी वेगळी आहे. सध्या जरी या स्कूटरची किंमत 1.13 लाख रुपये असली, तरी आम्ही ज्या डीलबद्दल सांगणार आहोत त्या अंतर्गत ही स्कूटर केवळ 30 हजार रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. या डीलबद्दल सविस्तर जाणून घेण्यापूर्वी, या स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

काय आहेत या स्कूटरची वैशिष्ट्ये?

Vespa LX मध्ये 125cc इंजिन देण्यात आले आहे. तसेच ती पिवळ्या रंगात उपलब्ध. Droom या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, Piaggio Vespa LX 125cc ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये किमान 40 किमी मायलेज देते. ही स्कूटर 9bhp पॉवर जनरेट करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या स्कूटरमध्ये 7 लीटरची इंधन टाकी आहे. या दुचाकीमध्ये पुढे आणि मागे ड्रम ब्रेक सिस्टम आहे, जी 150 MM ची आहे.

Vespa LX बाइक्स 24 वर लिस्टेड आहे, जी एक सेकंड हँड स्कूटर आहे. हे या स्कूटरचे 2014 सालचे मॉडेल आहे. तसेच, ही सेकेंड ओनर स्कूटर आहे. ही स्कूटर दिल्लीच्या DL-09 RTO मध्ये नोंदणीकृत आहे. यासोबतच मूळ आरसीही गाडीसह उपलब्ध आहे.

Bikes24 वर लिस्टेड, ही बाईक 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांच्या कॅशबॅकसह खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र, यासोबत काही अटी आणि शर्तीं देखील आहेत. कोणतीही सेकंड हँड स्कूटर खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच, वॉरंटी आणि कॅशबॅकच्या अटींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष करणे अतिशय निष्काळजीपणाचे ठरू शकते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही बाईक्स 24 वरुन घेतली आहे..

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Vespa LX Scooter for only 30 thousand rupees, know where to get great offer)