Tata Motors : SUVमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती?, नेक्सॉननं क्रेटाला टाकलं मागे? जाणून घ्या कारणं

| Updated on: May 10, 2022 | 2:56 PM

गेल्या आर्थिक वर्षात 4 हजार 219 युनिट होते. म्हणजेच तिची विक्री तिपटीने वाढली. यावरून हे देखील स्पष्ट होते की आता लोक इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत.

Tata Motors : SUVमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती?, नेक्सॉननं क्रेटाला टाकलं मागे? जाणून घ्या कारणं
कार
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  वाहन उद्योगात (Automotive Industry) स्पर्धा वाढते आहे. मोठं मोठ्या कंपन्या आपल्या विविध प्रकारच्या कार (Car) प्रकारांमध्ये वैविध्य आणतायेत. त्यातही वाहन उद्योगांच्या बाजारपेठा देखील वाढत आहेत. यातच टाटा मोटर्सनं (Tata Motors) इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली मुळे मजबूत केली आहेत. यामध्ये सर्वात जास्त ईव्ही मॉडेल्स आहेत. EV च्या आधारावर कंपनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये SUV सेगमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. म्हणजेच कंपनीची नेक्सॉन ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार होती. एवढेच नाही तर नेक्सॉन ईव्ही ही ईव्ही सेगमेंटमधील नंबर वन कार देखील होती. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये Nexon EV च्या 14 हजार 248 युनिट्सची विक्री केली. गेल्या आर्थिक वर्षात 4 हजार 219 युनिट होते. म्हणजेच तिची विक्री तिपटीने वाढली. यावरून हे देखील स्पष्ट होते की आता लोक इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. विशेष बाब म्हणजे Nexon EV च्या मदतीने कंपनीने विक्रीच्या बाबतीत Hyundai Creta लाही मागे टाकले आहे.

विक्री 95 टक्के वाढली

नेक्सॉनने आर्थिक वर्ष 2022 मध्ये Nexon च्या 1 लाख 24 हजार 130 युनिट्स विकल्या होत्या. तर क्रेटा टाटानं 6000 जास्त युनिट्स विकल्या. त्याची विक्री 95 टक्के वाढली. यादरम्यान नेक्सॉनने सहा हजार युनिट्समधून ह्युंदाई क्रेटाला मागे टाकलं. क्रेटाच्या 1 लाख 18 हजार 92 युनिट्सची विक्री झाली. नेक्सॉन इलेक्ट्रिकशिवाय हा टप्पा गाठणे टाटांसाठी कठीण झाले असते. कारण तेव्हा कोरियन कंपनी पुढे गेली असती. टाटा ही देशातील सर्वात मोठी SUV विक्री करणारी कंपनी बनण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. आर्थिक वर्ष 2022 ची आकडेवारी टाटासाठी गेल्या 15 वर्षातील सर्वोच्च आहे. कारण, त्याआधी आर्थिक वर्ष 2008 मध्ये कंपनीने Indica च्या 1 लाख 35 हजार 642 युनिट्सची विक्री केली होती.

सबसिडीचा समावेश नाही

2020 च्या सुरुवातीला Nexon EV लाँच करण्यात आले होते. यात 30.2 KWh लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. ज्याची ARAI प्रमाणित श्रेणी 312Km आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 229 PS पॉवर आणि 245 Nm टॉर्क निर्माण करते. त्याची किंमत 14.79 ते 17.40 लाख रुपये आहे. यामध्ये सबसिडीचा समावेश नाही. कंपनी बुधवारी 11 मे रोजी Nexon EV Max लाँच करणार आहे. त्याची रेंज 400Km च्या जवळपास असण्याची अपेक्षा आहे. त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा 3 ते 4 लाख रुपये जास्त असू शकते.

हे सुद्धा वाचा

सुरुवातीच्या काळात आघाडी

Tata Motors ने भारतातील इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांच्या बाजारपेठेत नेक्सॉन EV आणि Tigor EV भविष्यासाठी तयार असलेल्या टाटाच्या EV मॉडेल्ससह सुरुवातीच्या काळात आघाडी घेतली आहे. 2025 पर्यंत 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. अलीकडेच कर्व्ह आणि अविन्या हे दोन मॉडेल्स आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचे भविष्य यातून दिसते. कंपनी 2025 पर्यंत अविन्याला भारतीय बाजारात लाँच करू शकते. असे मानले जाते की त्याची श्रेणी 500Km पेक्षा जास्त असेल.