Budget 2021 : होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आणखी एक वर्ष व्याजावर दीड लाखांची अ‍ॅडिशनल सूट मिळणार

| Updated on: Feb 01, 2021 | 1:55 PM

केंद्र सरकारने घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Budget 2021 good news for home buyers).

Budget 2021 : होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आणखी एक वर्ष व्याजावर दीड लाखांची अ‍ॅडिशनल सूट मिळणार
घर खरेदी करण्याची योग्य संधी
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारने घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सेक्शन 80EEA अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखांच्या व्याजावर मिळणारी अ‍ॅडिशनल सूट पुढच्या एक वर्षभरासाठी वाढवली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ही स्किम 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. याआधी या स्किमची मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंतच होती. या निर्णयामुळे रिएल इस्टेट सेक्टरमध्ये तेजी येईल, अशी आशा आहे (Budget 2021 good news for home buyers).

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत घर मिळावं यासाठी सेक्शन 80EEA अंतर्गत 2019 च्या अर्थसंकल्पात संबंधित नियम लागू केला होता. या अंतर्गत इंट्रेस्ट रीपेमेंटवर 1.5 लाख रुपयांची वेगळी सूट मिळते. विशेष म्हणजे ही सूट सेक्शन 24 बी पेक्षा वेगळी आहे (Budget 2021 good news for home buyers).

अटी काय?

सेक्शन 80EEA चा लाभ घेण्यासाठी स्टॅम्प वॅल्यू 45 लाख पेक्षा जास्त असू नये. ही स्किम 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 पर्यंत लागू होती. मात्र, आता नव्या नियमानुसार ही स्किम 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. यासाठी घराचा कॉर्पोरेट एरिया हा 60 स्क्वेअर मीटर किंवा 645 स्क्वेअर फूट असणे बंधनकारक आहे. या अटी मुंबई, दिल्ली, बंगळुरु, नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता या शहरांसाठी लागू होतील. इतर शहरांसाठी कार्पोरेट एरिया 90 मीटर किंवा 968 स्कवेअर फूट असणं आवश्यक असणार आहे.

विशेष म्हणजे ज्या रिएल इस्टेट प्रोजेक्टला 1 सप्टेंबर 2019 रोजी मंजुरी मिळाली आहे, त्याच प्रोजेक्टमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मात्र, आता ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आल्याने प्रोजेक्टचा कालावधीदेखील वाढण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रिएल इस्टेट प्रोजेक्टच्या डेडलाईनबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी!

Banking Sector Union Budget 2021: मोठी बातमी! मोदी सरकार आयडीबीआय बँकेशिवाय दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपनीला विकणार

Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी