
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठ्या बदलाची घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना त्याचा फायदा होणार आहे. चार कोटी नोकरदार आणि पेन्शनधारकांचे 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये केली आहे. त्याचा हा फायदा होणार आहे. यापूर्वी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 2019 मध्ये बदलण्यात आली होती. एकीकडे नवीन करप्रणालीत बदल करताना जुनी करप्रणाली ‘जैसे थे’ ठेवली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा लावून बसलेल्या मध्यमवर्गींचा भ्रमनिराश झाला आहे.
जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ जे काही बदल झाले आहेत, जे नवीन कर स्लॅब निवडतील त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. वास्तविक, नोकरदारांना आशा होती की, यावेळी अर्थमंत्री अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलासा देतील. यावेळी अर्थमंत्र्यांनी निराशा केलेली नाही. मानक वजावट वाढवून सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये बदल केले आहेत. नवीन कर स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना किमान 17500 रुपयांची बचत करता येणार असल्याचे अर्थमंत्र्यांचे म्हणणे आहे.
जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ जे काही बदल झाले आहेत, जे नवीन कर स्लॅब निवडणाऱ्यांना मिळतील. या घोषणेचा परिणाम सोशल मीडियावर उमटला. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया सुरु झाल्या.