Zomato: ऑनलाईन जेवण मागवणे महाग झाले, आता झोमॅटोचा प्रत्येक ऑर्डरवर १९.२ टक्के जास्त चार्ज

एकीकडे इराण युद्धामुळे गॅस आणि इंधन दरात वाढ झाली असताना आता ऑनलाईन अन्न पदार्थ मागवणे देखील महाग झाले आहे. झोमॅटोने आपली फी वाढवली आहे.

Zomato: ऑनलाईन जेवण मागवणे महाग झाले, आता झोमॅटोचा प्रत्येक ऑर्डरवर १९.२ टक्के जास्त चार्ज
Zomato fee hike
| Updated on: Mar 20, 2026 | 7:16 PM

आता ऑनलाईन जेवण मागवणे आणखीन महागात पडणार आहे. प्रसिद्ध झोमॅटो (Zomato) या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्मने पुन्हा एकदा फिमध्ये वाढ केली आहे. कंपनीच्या एपवरील शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म फिमध्ये १९.२ टक्के म्हणजे २.४० रुपये प्रति ऑर्डर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे शुल्क प्री-जीएसटी आधारावर १२.५० रुपयांनी वाढून १४.९० रुपये प्रति ऑर्डर करण्यात आले आहे. ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने रेस्टॉरंट्स आणि डिलीव्हरी पार्टनर्सचा खर्च वाढला आहे. वाढत्या ऑपरेशनल खर्चाला संतुलित करण्यासाठी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स किंमतीत बदल करत आहेत.

कंपनीने सप्टेंबरमध्ये फिमध्ये वाढ केली होती

कंपनीने याआधी सप्टेंबर २०२५ मध्ये प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली होती. फेब्रुवारीत फेस्टीव्ह सिजन दरम्यान यास ६ रुपयांनी वाढ करुन १० रुपये प्रति ऑर्डर केले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये झोमॅटोने पहिल्यांदा २ रुपये प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म फि लागू केली होती. ज्यानंतर फीमध्ये हळूहळू वाढ केली असती. झोमॅटोचा प्रतिस्पर्धी स्विगी सध्या १४.९९ रुपये प्रति ऑर्डर ( टॅक्स सह ) प्लॅटफॉर्म फी वसुल करत आहे. ज्यामुळे दोन्ही कंपन्यात स्पर्धा वाढली आहे. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे जेव्हा फूड डिलीव्हरी कंपन्या वाढता खर्च वसुल करण्यासाठी आपल्या युनिट इकॉनॉमिक्स आणि मार्जिन सुधारण्यावर ध्यान देत आहेत.

कंपनीची आर्थिक प्रगती

शेअर बाजारात इटरनल ( आधीची झोमॅटो ) चे शेअर शुक्रवारी २३३ रुपयांवर बंद झाला. जो गेल्या वेळच्या बंद झालेल्या पातळीवरुन १.८६ टक्के आणि आठवडाभरात सुमारे ७.५ टक्क्यांची वाढ दर्शवत आहेत. मात्र, गेल्या एक महिन्यात सुमारे १३ टक्के घसरण नोंदली गेली आहे.

आर्थिक स्थिती

कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत ७२.८८ टक्के वाढी सह १०२ कोटीचा शु्द्ध नफा कमावला आहे. जो गेल्यावेळी याच काळात ५९ कोटी रुपये होता. तर ऑपरेशन्समुळे महसूल तीन पटीने वाढून १६,३१५ कोटी झाला आहे.जो एक वर्षांपूर्वी ५,४०५ कोटी रुपये होता. मार्च २०२५ मध्ये झोमॅटोने स्वत:चे रिब्रँडींग करत इटरनल लिमिटेड केले आहे. या दरम्यान कंपनीच्या खर्चात वेगाने वाढ झाली आहे.

 

Follow Us