या 5 बँका एका वर्षांच्या एफडीवर देत आहेत तगडे रिटर्न ! तुमच्या 10 हजाराचे किती होतील

Top 5 Bank FDs Interest Rates: इंडसइंड बँक त्याच्या ग्राहकांना एक वर्षांच्या एफडीवर ६.८ टक्के व्याज देते. तर सिटी युनियन बँक एक वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ६.७ टक्के व्याज देते.

या 5 बँका एका वर्षांच्या एफडीवर देत आहेत तगडे रिटर्न ! तुमच्या 10 हजाराचे किती होतील
fd news
| Updated on: Nov 04, 2026 | 5:59 PM

फिक्स्ड डिपॉझिट ही बँकेतील पैसे सुरक्षितपणे वाढवण्याची योजना आहे. ज्या लोकांना शेअर बाजारातील चढउताराची रिस्क नको असते आणि फिक्स व्याजावर परतावा हवा असतो, ते सर्व जण बँकेत एफडी उघडण्यास प्राधान्य देतात. आज आपण टॉप ५ बँकाच्या एफडीची माहिती घेणार आहोत. आज आपण बंधन बँक, डीसीबी बँक, आरबीएल बँक, इंडसइंड बँक आणि सिटी युनियन बँक या बँकेचे एफडीचे व्याज दर पाहणार आहोत. आता जाणून घेऊयात की या बँकांच्या एफडीवर एक वर्षांचा व्याजदर किती आहे. तसेच कोणी या एफडीत १० हजार रुपयांची एकरकमी रक्कम गुंतवली तर एक वर्षांनी मॅच्युरिटीत किती रुपये मिळू शकतील.

एक वर्षांच्या एफडीवर बँक किती व्याज देते ?

हे वेगवेगळ्या बँकाच्या व्याजदरावर अवलंबून आहे. येथे आपण सध्या पाच बँकांचे एफडी व्याजदराची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला बंधन बँकेपासून करुयात. ही बँक एक वर्षांच्या एफडीवर वार्षिक सात टक्के व्याज देते. याचे हे व्याजदर त्रैमासिक चक्रवाढ व्याज आहे.

Loading...

डीसीबी बँकचा विचार केला तर हीचे व्याज ६.९ टक्के आहे. तसेच आरबीएल बँकेचे देखील व्याजदर ६.९ टक्के आहे.
इंडसइंड बँकेचे एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर ६.८ टक्के आहे. तसेच सिटी युनियन बँकेचा विचार केला तर ही बँक एक वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ६.७ टक्के व्याज देते.

एक वर्षांच्या एफडीत १० हजार रुपयांचे किती होतात ?

या पाच बँकाच्या एक वर्षांच्या एफडीत १० हजर रुपयांचे किती होतात ? याची माहिती खालील टेबलमध्ये देत आहोत.

बँकेचे नावव्याज दर (%) (त्रैमासिक चक्रवाढ व्याज )₹10,000 चे वाढून किती होणार
बंधन बँक7 टक्के10,719
डीसीबी बँक 6.9 टक्के10,708
आरबीएल बँक6.9 टक्के10,708
इंडसइंड बँक6.8 टक्के10,692
सिटी युनियन बँक 6.7 टक्के10,682

येथे दिलेल्या आकड्यांना कोणा एका विशेष बँकेची पक्की मॅच्युरिटी रक्कम मानू नये. अंतिम मॅच्युरिटीची रक्कम येथे सांगितलेल्या आकड्यांहून वेगळी असू शकते. यामुळे १० हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर मिळणारी अचूक मॅच्युरिटी रक्कम जाणून घेण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करुन माहिती घेणे उत्तम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us