
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली. 10 ऑगस्ट रोजी लॉन्च झाल्यापासून एका आठवड्यात 60 लाख नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज प्राप्त झालेत. जेव्हा ही योजना पहिल्यांदा 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती, तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की, गरीब माता आणि बहिणींना आता धुरापासून मुक्तता मिळेल. सहा वर्षे उलटून अजूनही करोडो गरीब कुटुंबे गॅस सिलिंडरच्या सुविधेपासून वंचित असल्याचं समजल्यानंतर मोदींनी उज्ज्वला योजना 2.0 लाँच केली.


गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरवरची सबसिडी बंद झाली होती. परंतु आता ती पुन्हा सुरू करण्यात आलीय. ग्राहकांच्या खात्यात सबसिडीच्या स्वरुपात 79.26 रुपये पाठवले जात आहेत. जर तुम्ही देखील सिलिंडर खरेदी करत असाल आणि पात्र असूनही सबसिडी मिळत नसेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

उज्ज्वला 2.0 च्या लाभार्थी कुटुंबांना प्रथमच भरलेले गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह मोफत मिळतील. याशिवाय नावनोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी कागदोपत्री ठेवण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.
