8 वेतन आयोगात सरकारी शिक्षकांना पगारात मोठी वाढ ? शिक्षक संघटनांनी ठेवला प्रस्ताव

आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी शिक्षकांसाठी मोठी आशा लागून राहिली आहे. शिक्षक संघटनांनी आपल्या प्रस्तावाला एंट्री लेव्हल शिक्षकांसाठी 1.34 लाख रुपयांपर्यंत बेसिक सॅलरीची मागणी केली आहे. इतरही अनेक मागण्या केल्या आहेत.

8 वेतन आयोगात सरकारी शिक्षकांना पगारात मोठी वाढ ? शिक्षक संघटनांनी ठेवला प्रस्ताव
8 th pay commission
| Updated on: Apr 25, 2026 | 10:34 PM

8th Pay Commission teachers salary: केंद्र सरकारच्या शिक्षकांसंदर्भात मोठी अपडेट आली आहे. ८ व्या वेतन आयोगाच्या आधी शिक्षक संघटनांनी अशा मागण्या केल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. या मागण्यात किमान वेतन ५०,००० तसेच १.३४ लाख रुपयांपर्यंतची बेसिक सॅलरी, जास्त भत्ते आणि जुन्या पेन्शन योजनेची मागणी अशा मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या आहेत.

किमान वेतन ५० हजार रुपये

केंद्रीय सरकारी शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना प्रगतीशील शिक्षक न्याय मंचा ( PSNM ) ने ८ व्या वेतन आयोगाला आपला मेमोरेंडम सोपवला आहे. या लेव्हल – १ कर्मचाऱ्यांसाठी किमान बेसिक वेतन ५० हजार ते ६० हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच एंट्री लेव्हल शिक्षक ( लेव्हल-६ ) साठी किमान बेसिक वेतन १,३४, ५०० रुपये करण्याची मागणी केली आहे.

फिटमेंट फॅक्टर आणि सॅलरी ग्रोथ

संघटनेने फिटमेंट फॅक्टरला २.६२ नी वाढवून ३.८३ पर्यंत करण्याची मागणी ठेवली आहे. या सोबत वार्षिक इन्क्रीमेंट ६ ते ७ टक्क्यांपर्यंत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यामुळे पगारात सुमारे १० टक्के वार्षिक वाढ शक्य होऊ शकेल. अशात जर तुलना केली तर सातव्या वेतन आयोगात लेव्हल – १ कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी १८ हजार रुपये होती, फिटमेंट फॅक्टर २.५७ आणि इन्क्रीमेंट ३ टक्के होता.

भत्त्यात बदलाची मागणी

PSNM ने हाऊस रेंट अलाऊन्सला १० टक्के, २० टक्के आणि ३० टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे १२ टक्के, २४ टक्के आणि ३६ टक्के करण्याची मागणी केली आहे. ट्रान्सपोर्ट अलाऊन्स देखील वाढवून बेसिक सॅलरीच्या १२ टक्क्यांहून १५ टक्के करणे आणि न्यूनतम ९००० रुपयांपर्यंत निश्चित करण्याची मागणी केली आहे.

मुलांचे शिक्षण आणि मेडिकल सुविधा

संघटनेने मुलांचे शिक्षणासाठी मिळणारा भत्ता वाढवून ७,००० रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व शिक्षकांसाठी १०० टक्के कॅशलेस मेडिकल सुविधा (ओपीडी आणि आयपीडी दोन्ही ) लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
सुट्ट्या, प्रमोशन आणि विमा

PSNM ने वर्षाला १४ दिवसांची कॅज्युअल लिव्ह, ३० दिवसांची अर्जित रजा आणि २० दिवसांची मेडिकल लिव्हची मागणी केली आहे. निवृत्तीनंतर अर्जित रजा कॅश करण्याची सीमा ३०० दिवसांहून वाढवून ४०० दिवस करण्याची मागणी केली आहे. ग्रुप इंश्योरन्स कव्हर वाढवून १ कोटी वरुन २ कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

प्रमोशन आणि पेन्शनवर मोठी मागणी –

संघटनांनी प्रमोशनच्या कालमर्यादेला १०,२०, ३० वर्षांहून घटवून अनुक्रमे ६,१२,१८ आणि २४ वर्षे करण्याची मागणी केली आहे. याशिवाय नवीन पेन्शन योजनेला समाप्त करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे.

Follow Us