
8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. तर इतर कर्मचारी सुद्धा या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सरकारने आता 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th Central Pay Commission) अधिकृत वेबसाईट, संकेतस्थळ लाँच करण्यात आले आहे. साईट लाँच झाल्यानंतर 8 व्या वेतन आयोगाने सरकारी मंत्रालय, कर्मचारी आणि सहभागीदार यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. वेतन आयोगाची साईट MyGov पोर्टलसोबतही जोडल्या गेली आहे. आता कर्मचारी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया, सूचना आयोगाला देऊ शकतात.
वेतन आयोगाला द्या माहिती
वेतन आयोगाने आपल्या नवीन वेबसाईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला चांगली माहिती देण्यासाठी तुमचे विचार, सूचना आणि इतर माहिती शेअर करा. हे इनपुट MyGov.in च्या वेब पोर्टलर एक 18 प्रश्नावलीतून व्यवस्थितरित्या मागवण्यात येत आहेत. इथं तुम्हाला जर काही माहिती द्यायची असेल तर ती त्वरीत देता येईल.
वेतन आयोगाने या पोस्टमध्ये विविध मंत्रालये, विविध विभाग, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचारी, केंद्र शासित प्रदेशातील कर्मचारी, न्यायीक अधिकारी, न्यायपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नियामक आयोगाचे सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संशोधनकर्ते यांच्याकडून या प्रश्नावलीवर सूचना आणि माहिती मागवली आहे.
8व्या वेतन आयोगाची वेबसाईट इथं पाहा
8 व्या वेतन आयोगाची अधिकृ वेबसाईट, संकेतस्थळ तयार करण्यात आले असून ते लाईव्ह आहे. आयोगाने हे संकेतस्थळ लाँच केले आहे. वेतन आयोगाची साईट 8cpc.gov.in अशी आहे. या साईटवर गेल्यावर सध्या काय कामकाज सुरू आहे. कोण अध्यक्ष, सदस्य आहेत याची माहिती मिळते. वेतन आयोगाची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आहे.
भारत सरकार के द्वारा #8CPC की वेबसाइट चालू कर दी गई है। तमाम फीचर्स जैसे #TOR #ऑफिस_बियरर्स, CPC गजट, पिछली रिपोर्ट्स आदि शो हो रहे हैं। हम सब कर्मचारियों के लिए ये खुशी की बात है। जल्द बैठकें भी शुरू हो सकती हैं। हम लगातार इसके लिए आवाज उठाते रहे हैं। हमें भरोसा है, पे कमीशन भी… pic.twitter.com/9PQOB3QCxX
— Dr Manjeet Singh Patel (@ManjeetIMOPS) February 7, 2026
केंद्रीय वेतन आयोगाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील सरकारी कर्मचारी, न्यायपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नियामक आयोगाचे सदस्य, सेवानिवृत्त कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संशोधनकर्ते यांच्यांकडून 18 प्रश्नांच्या प्रश्नावलीवर त्यांची मतं मागवली आहे. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी अथवा संशोधक असाल तरीही तुम्हाला तुमचे मत मांडता येईल. विशेष म्हणजे तुम्ही जे मत मांडाल अथवा जी काही माहिती द्याल ती गोपनीय ठेवण्यात येईल. पण तुमचे काही मत आणि विचार, सूचना द्यायच्या असतील त्या बिनधास्त द्या. त्यामुळे भविष्यातील तुमच्या वेतनासंबंधीच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील.