Adani-Hindenburg Saga: LIC चेअरमन यांची घोषणा, अदानी ग्रुपच्या टॉप मॅनेजमेंटची भेट घेणार ही होणार चर्चा

| Updated on: Feb 10, 2023 | 12:41 PM

अदानी ग्रुपमध्ये एलआयसीच्या गुंतवणूकीवरून विरोधी पक्षांसह गुंतवणूकदार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एलआयसीच्या चेअरमनने आपण अदानी समुहाची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

Adani-Hindenburg Saga: LIC चेअरमन यांची घोषणा, अदानी ग्रुपच्या टॉप मॅनेजमेंटची भेट घेणार ही होणार चर्चा
LIC
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुप कंपनीचे शेअर अमेरिकन गुंतवणूक सल्लागार हिंडेनबर्ग यांनी अहवाल जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात गडबडले होते. त्यानंतर अदानी ग्रुपमध्ये केलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकीमुळे सरकारला टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यातच एसबीआय बॅंकेने देखील अदानी समुहाला भलेमोठे कर्ज दिल्याचे उघडकीस आले आहे. एसबीआय बँकेच्या चेअरमनने अदानी यांना  तब्बल 27000 कोटींचे कर्ज दिल्याचे स्पष्टीकरण केले आहे.

भारतीय जीवन विमा निगम अर्थात  एलआयसीचे अध्यक्ष ए.आर.कुमार यांनी सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे अधिकारी अदानी ग्रुपच्या टॉप मॅनेजमेंटशी याबाबत बैठक घेणार आहेत. या दरम्यान ते अदानी ग्रुपमधील संकटाबद्दल स्पष्टीकरण मागणार आहेत. अदानी ग्रुपमध्ये एलआयसीच्या गुंतवणूकीवरून विरोधी पक्षांसह गुंतवणूकदार टीका करत आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचे अनेक शेअर गंटाळल्या खात आहेत. या अहवालात अदानी समुहावर कथित गैरव्यवहार आणि लेखा परिक्षणात घोटाळा केल्याचा आरोप होत आहेत.

कायदेशीर कारवाईचा इशारा

अदानी ग्रुपने हिंडेनबर्गच्या अहवालाना संपूर्णपणे नाकारत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एलआयसीच्या अध्यक्षांनी आर्थिक परीणामांची घोषणा करताना सांगितले की आमच्या गुंतवणूक सल्लागार टीमने आधीच अदानी यांच्या कडून स्पष्टीकरण मागितले आहे. आमचे प्रमुख व्यवस्थापन या प्रकरणात त्यांच्याशी संपर्क करतील, आता आम्ही आर्थिक अहवालाच्या चिंतेत आहोत. लवकर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि या प्रकरणात स्पष्टीकरण मागणार आहोत की बाजार आणि अदानी समुहात काय सुरू आहे. असे असले तरी अध्यक्ष ए.आर. कुमार यांनी एलआयसी आणि अदानी समुह यांची बैठक नेमकी केव्हा होईल याबाबत काही सीमारेषा  निश्चित केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.