शेअर बाजारात येतोय आदित्य बिर्ला सनलाईफचा IPO, गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

| Updated on: Aug 07, 2021 | 2:03 PM

आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीचा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांचा असू शकतो. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (Offer for Sale) असणार आहे. याअंतर्गत आदित्य बिर्ला सनलाईफच्या 13.5 टक्के शेअर्सची विक्री केली जाईल.

शेअर बाजारात येतोय आदित्य बिर्ला सनलाईफचा IPO, गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या या गोष्टी
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी
Follow us on

मुंबई : अलिकडच्या काळात शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण नवनवीन कंपन्या शोधत असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय समोर येत आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचा (Aditya Birla Sun Life AMC ) इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ (IPO) लवकरच शेअर बाजारात येण्याची शक्यता आहे. सिक्योरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीच्या आयपीओला मंजूरी दिली आहे. (Aditya Birla Sun Life AMC’s IPO has been cleared by the Securities and Exchange Board of India (SEBI)

25 हजार कोटी रुपयांचा आयपीओ

आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीचा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांचा असू शकतो. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (Offer for Sale) असणार आहे. याअंतर्गत आदित्य बिर्ला सनलाईफच्या 13.5 टक्के शेअर्सची विक्री केली जाईल. सोबतच या ऑफरमध्ये कंपनी आपल्या कॅनेडियन जॉईंटव्हेंचर पार्टनर कंपनी सनलाईफच्या 12.5 टक्के शेअरर्सची विक्री करणार आहे.

शेअर बाजारातली चौथी AMC कंपनी

आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी कंपनीत आदित्य बिर्ला यांची 51 टक्के भागीदारी आहे. तर कॅनेडियन कंपनी सन लाईफची 49 टक्के भागीदारी आहे. सध्या HDFC AMC, UTI AMC, निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यानंतर आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसी ही शेअर बाजारातली चौथी अॅसेट मॅनेटमेंट कंपनी (AMC) असणार आहे.

एका शेअरची किंमत 5 रुपये

आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसी कंपनीने 19 एप्रिल 2021 ला आयपीओसाठी अर्ज केला होता. त्याला आता सेबीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर या कंपनीचे 28 लाख 50 हजार 880 शेअर्स बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. यांची किंमत प्रत्येकी 5 रुपये असणार आहे. याशिवाय सनलाईफ एएमसीने 3 कोटी 60 लाख 29 हजार शेअर्स बाजारात विक्रीसाठी काढले आहेत. (Aditya Birla Sun Life AMC’s IPO has been cleared by the Securities and Exchange Board of India (SEBI)

 

संबंधित बातम्या :

चांगली बातमी! ‘या’ बँकेने व्याजदरात केली कपात, गृह-वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त

EPFO Rules: PF खातेदारांनो तात्काळ नॉमिनीचं नाव जोडा, अन्यथा 7 लाखांचं नुकसान होणार

Alert! HDFC बँकेच्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 28 तासांसाठी बंद, पटापट कामं उरका