AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert! HDFC बँकेच्या ‘या’ सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 28 तासांसाठी बंद, पटापट कामं उरका

नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगवर ग्राहकांना या सेवा मिळू शकणार नाहीत. या दरम्यान, जर एखाद्या ग्राहकाला या सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना तो घेता येणार नाही, यासाठी बँकेने माफीसुद्धा मागितली.

Alert! HDFC बँकेच्या 'या' सेवा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 28 तासांसाठी बंद, पटापट कामं उरका
HDFC Bank
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 10:20 AM
Share

नवी दिल्लीः जर तुम्हीही देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे माहिती देत ​​आहे की, बँकेची ही सेवा 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ते 8 ऑगस्टला रात्री 10 वाजेपर्यंत 28 तास बंद राहणार आहे. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगवर ग्राहकांना या सेवा मिळू शकणार नाहीत. या दरम्यान, जर एखाद्या ग्राहकाला या सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना तो घेता येणार नाही, यासाठी बँकेने माफीसुद्धा मागितली.

आम्ही सध्या शेड्युल्ड मेटनन्स करत आहोत

एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग व्यवहार केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. पण आम्ही सध्या शेड्युल्ड मेटनन्स करत आहोत. या उपक्रमादरम्यान HDFC बँक खालील व्यवहार नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅप्सवर करू शकणार नाहीत.

नेट बँकिंगवर त्यांचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डाऊनलोड होणार नाही

>> बँकेचे ग्राहक 7 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता ते 8 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत मोबाईल किंवा नेट बँकिंगवर त्यांचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डाऊनलोड करू किंवा पाहू शकणार नाहीत. >> त्याचवेळी 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सेवा घेऊ शकणार नाहीत.

जून तिमाहीत नफ्यात 14.36 टक्के वाढ

जून तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वर्षभरात 14.36 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि ती 7922 कोटी रुपये झाली. वर्षभरापूर्वी एप्रिल-जून तिमाहीत बँकेला 6,927.24 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.

एप्रिल-जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 36,771 कोटी रुपये

एप्रिल-जून तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 36,771 कोटी रुपये झाले, जे एक वर्षापूर्वी 34,453 कोटी रुपये होते. या वर्षी 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचे सकल एनपीए प्रमाण 1.47 टक्क्यांवर वाढले, जे एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील 1.36 टक्के आणि मार्च तिमाहीत 1.32 टक्के होते.

आता तुम्ही डेबिट कार्डशिवाय ATMमधून पैसे काढू शकता

HDFC बँकेचे ग्राहक आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून पैसे काढू शकतात. एचडीएफसी बँकेनेच या नवीन सुविधेची माहिती दिलीय. बँकेनेही याबाबत ट्विट केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘एटीएम कार्ड विसरलात? काळजी करू नका. HDFC बँक कार्डलेस कॅश आता #DigitallyYours आहे, ज्यामुळे तुम्हाला HDFC बँक 24X7 मधून रोख रक्कम काढता येते. एटीएम/डेबिट कार्डशिवाय अत्यंत सुरक्षित मार्गाने पैसे काढता येतील.

संबंधित बातम्या

ATM मधून पैसे बाहेर न आल्यास बँक दररोज 100 रुपये देणार; तुम्हाला नियम माहीत आहे का?

15 ऑगस्टपासून बँक खात्याशी संबंधित हा नियम बदलणार, हे काम करा अन्यथा पेमेंट थांबणार

Alert! This service of HDFC Bank will be closed for 28 hours from 6 pm this evening

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.