
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बँकेची YONO सेवा 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री म्हणजेच आज रात्री उशिरा 12:30 ते 1:30 या कालावधीत एका तासासाठी बंद राहणार आहे. या काळात ग्राहक योनो अॅपवर मिळणाऱ्या सेवा वापरू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र या काळात बँकेच्या इतर सेवा मात्र सुरु राहणार आहेत.
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 3, 2025
रात्री 12.30 ते 1.30 या कालावधीत ग्राहक ग्राहक मनी ट्रान्सफर आणि इतर सेवा वापरू शकणार नाहीत. या काळात तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर काळजी करू नका. या काळात ATM मधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच या काळात UPI Lite वर कोणताही परिणाम होणार नाही. याद्वारे तुम्ही ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ द्वारे व्यवहार करू शकता. अशा व्यवहारासाठी बँक खात्याशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नसते. मात्र ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करावे लागणार आहेत.
ग्राहक SBI च्या टोल फ्री क्रमांक 18001234 आणि 18002100 वर कॉल करून बँक संबंधित कामे करू शकता. तसेच SBI संपर्क केंद्राद्वारे सेवा मिळवू शकता. ग्राहकांना या काळात त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून बँकेने ही सुविधा दिली आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे.