AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार

Nirmala Sitharaman Union Budget 2026: दुर्मिळ खजिनांसह सेमीकंडक्टरपर्यंत चीनला भारत मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात मोठी चालना मिळेल. तर या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतील.

Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
या शेअरमध्ये मोठी उसळीImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 01, 2026 | 12:26 PM
Share

Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सेमीकंडक्टरविषयी मोठी घोषणा केली आहे. दुर्मिळ खनिजांसह सेमीकंडक्टरसाठी मोठी घोषणा केली आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठा बुस्टर डोस देण्यात आला आहे. रेअर अर्थ मटेरिअलसाठी ओडिसा, तामिळनाडू, आंध्रप्रदेशात खास प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दुर्मिळ घटकांसाठी खास मिनरल पार्क तयार करण्यात येणार आहे. या सर्व घाडमोडींमुळे डिक्सन टेक, सीजी पॉवरसह चिप तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शेअरमध्ये 6 टक्क्यांची तेजी आली आहे. तर अजून हे शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये यासाठी खास घोषणा केली आहे. EMS PLI वाढवून 40 हजार कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याशिवाय तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशातील दुर्मिळ खनिजांसाठी एक खास कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तर सेमीकंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे. यामुळे चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. तर निर्मला सीतारमण यांनी कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवले. त्यासाठी 12.20 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी 40 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.

भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन हब तयार करण्यासाठी बायोफार्मा शक्ती योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. इंडिया सेमिकंडक्टर मिशन 2.0 ची सुरुवात करण्यात आली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट तयार करण्याची योजनेला निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी 40,000 कोटी रुपये देण्यात येतील. ओडिशा, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडूमध्ये दुर्मिळ खनिज कॉरिडॉर तयार करण्यात येतील.

या शेअरमध्ये मोठी उसळी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट तयार करण्यासाठी 40,000 कोटी रुपये वितरीत करण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी खास सत्रात शेअर बाजारात या क्षेत्रातील स्टॉकमध्ये तुफान आले. एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया, एम्बर एंटरप्रायईजेज इंडिया, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, एवलॉन टेक्नॉलॉजीज आणि साएंट डीएलएम सारखे शेअर 7 टक्क्यांनी उसळले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी