लाखो विक्रेते, अब्जावधींचा व्यवसाय.. Amazon Great Indian Festival ची आतली गोष्ट..

घरातल्या गरजेच्या वस्तू, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स.. छोट्या पिनपासून ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्ही सध्या ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. मात्र ही सेवा तुमच्या घरापर्यंत कशी पोहोचवली जाते, त्यामागे किती लोक काम करतात, हे सर्व या लेखातून जाणून घेऊयात..

लाखो विक्रेते, अब्जावधींचा व्यवसाय.. Amazon Great Indian Festival ची आतली गोष्ट..
Amazon Great Indian Festival
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2024 | 3:02 PM

गणेशोत्सव, दिवाळी, होळी.. असे मोठमोठे सण-उत्सव म्हटलं की पूर्वी आई-बाबांसोबत बाजारात जाऊन सणासुणीच्या सामानाची खरेदी केली जायची. आता मोबाइल आणि डिजिटलच्या जमान्यात एका क्लिकवर तुम्ही घरातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू ऑर्डर करू शकतो. ती वस्तू तुम्ही निवडलेल्या तारखेनुसार घराच्या दारापर्यंत पोहोचवली जाते. एखादी वस्तू खरेदी करणं हल्ली इतकं सोपं झालंय. मात्र ॲपमध्ये एखादी वस्तू ऑर्डर करण्यापासून ते घरापर्यंत ती डिलिव्हर होण्यापर्यंत एक मोठं ई-कॉमर्स काम करतंय. यामागे किती लोक कसे काम करतायत, किती पैशांची उलाढाल होतेय, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची यात काय भूमिका आहे, ते आपण या लेखात समजून घेऊयात. ‘ॲमेझॉन डॉट इन’ हा सध्या देशातील सर्वांत मोठा ई-कॉमर्स व्यवसाय आहे. देशभरातील लाखो ग्राहक ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची आतुरतेने वाट पाहत असतात. या ॲमेझॉनची प्रत्यक्षात सुरुवात 5 जून 2013 रोजी झाली. देशात सर्वाधिक प्रॉडक्ट सर्च हे ॲमेझॉनवरच होतं. बेंगळुरूमध्ये ॲमेझॉनचा मोठा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा