नोकरीच्या कटीकटीतून मुक्त व्हा, अमुल देत आहे दर महिना 1.5 लाख कमावण्याची संधी, कशी ते पाहा

जर तुम्ही नोकरीला कंटाळला आहात. आणि स्वत:चा धंदा उघडू इच्छीत आहात तर तुम्हाला अमूलने एक चांगली संधी आणली आहे. काय आहे ही संधी पाहूयात....

नोकरीच्या कटीकटीतून मुक्त व्हा, अमुल देत आहे दर महिना 1.5 लाख कमावण्याची संधी, कशी ते पाहा
Business Ideas
| Updated on: Dec 20, 2025 | 10:45 PM

जर तुम्ही नोकरीच्या कटीकटीतून मुक्त होऊ इच्छीता. स्वत:चा बॉस स्वत:च बनू इच्छीता तर अमुल कंपनीने तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे. जेथे अमुल दूधाची फ्रँचाईजी उघडून पैसे कमावण्याची संधी देत आहे. या बाबतीत तुम्ही अमूल कंपनीची फ्रँचाईजी उघडू शकता. त्यात किती फायदा होणार आहे ते पाहूयात…

केवळ 2.6 लाख रुपयांत काम सुरु

आजकाल एक चांगली चहाची टपरी उघडण्यासाठी देखील लाखो रुपयांचा खर्च येतो. परंतू अमूलशी बिझनस करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची काही गरज नाही. तुम्ही 2 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करुन स्वत:चा आऊटलेट उघडू शकता. अमुल मुख्य रुपाने दोन प्रकारचे फ्रँचाईजी देत आहे..

अमूल प्रेफर्ड आऊटलेट

केवळ 2 लाख ते 2.6 लाख रुपये लावून तुम्ही काम करु करतो. 100-150 स्क्वेअर फूटाची जागा घेऊन आम्ही काम करु शकतो. यात 25,000 रुपयांचा रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट्स, 1 लाख रुपये रिनोव्हेशन आणि 75,000 रुपये इक्विपमेंटवर खर्च होतात.

आइस्क्रीम स्कूपिंग पार्लर

जर तुमच्याकडे 6 लाख रुपये आहेत आणि थोडी जागा आहे. तर तुम्ही आईस्क्रीमचे आलिशान पार्लर खोलू शकता. यात 50,000 रुपये सिक्युरिटी आणि उर्वरित रक्कम दुकानावर सजावट आणि मशीन्सवर खर्च होतात.

कमाई आणि नफा

अमुलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कंपनलीला कोणतीही रॉयल्टी वा प्रॉफिट शेअरिंग द्यावी लागणार नाही. तुम्ही जेवढी विक्री होईल तेवढा फायदा तुम्हाला होईल. तसेच अमूलचे म्हणणे आहे की जर तुमचे दुकान योग्य जागेवर असेल तर तुम्ही दर महिन्याला 40,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत कमाई करु शकता.

प्रोडक्ट्सवर कमीशन

दूधाच्या पाऊचवर: 2.5%

मिल्क प्रोडक्ट्सवर (पनीर, तूप, लोणी ) : 10%

आइस्क्रीमवर: 20%

रेसिपीवर आधारित आयटमवर (शेक, सँडविच) : 50% पर्यंत

अमूलची फ्रँचाईजी कशी घ्यावी ?

जर तुम्ही अमुलची फ्रँचाईजी घेऊ इच्छीत असाल कर प्रक्रीया एकदम सोपी आहे. अर्ज करण्यासाछी केवळ अमूलची अधिकृत वेबसाईट www.amul.com ला भेट द्या. इंटरनेटवर अनेक बनावट वेबसाईट असून त्या अमूलच्या नावाने फसवतात. अमूल कधीच तुमच्याकडून ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नावाखाली पैसे मागत नाही. अर्ज करताना आधारकार्ड, पॅनकार्ड, दुकानाची कागदपत्रे वा रेंट एग्रीमेंट आणि बँकेचे डिटेल्स द्यावे लागतील.