कोणती बँक देत आहे सर्वात स्वस्तातले गृहकर्ज, येथे पाहा संपूर्ण लिस्ट
जर तुम्ही घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल,कोणती बँक स्वस्तातील गृहकर्ज देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चला तर पाहूयात कोणती बँक कमी व्याजदरात गृहकर्ज देते....

स्वत:चे घर असणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. जे लोक भाड्याच्या घरात रहातात त्यांना स्वत:च्या घर घेण्याची ओढ असते. घरासाठी कर्ज काढायची वेळ प्रत्येकावर येत असते. अशात बँकेचे होम लोन घेऊन लोक घराचे स्वप्न पाहात असतात. परंतू होम लोन घेण्यासाठी त्याचे व्याज दर कमी असले तर फायद्याचे असते. बँकेचे होम लोनचे व्याज दर जर जास्त असतील तर तुमच्या खिशावर जास्त भार येण्याची शक्यता असते. चला तर पाहूयात,कोणत्या बँकेच्या होम लोनचे दर सर्वात कमी आहेत.
सर्वात कमी व्याज दर देणारे होम लोन
जर तुम्ही आज स्वत:चे घर घेऊ इच्छीता आणि घरासाठी होम लोन घेऊ इच्छीत असाल तर सर्वात कमी व्याज दर देणारे अनेक बँका आहेत. यात Union Bank of India, Central Bank of India, Bank of Maharashtra आणि Bank of India सारख्या बँकांचा समावेश आहे. या बँकाचे होम लोनचे व्याज दर 7.35 टक्के प्रतिवर्ष असे सुरु होते. जे देशातील अनेक बँकांच्या तुलनेत कमी आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे होम लोन
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे होम लोन सुमारे 30 वर्षांसाठी घेऊ शकता. याची प्रोसेसिंग फी 20,000 रुपयांहून जास्त नाही. यात बँकने नोकरीपेशा लोकांना घराची किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत लोन मिळू शकते. तर बिझनस करणाऱ्या लोकांना घराची किंमतीच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. येथे होम लोन 7.35 टक्के प्रतिवर्ष व्याजाने मिळते. ज्याचा वापर तुम्ही जुने किंवा नवीन घर खरेदी करणे, घर बांधणे किंवा दुरुस्त करणे किंवा इंटीरेअर अपग्रेड करण्यासाठी करु शकता.
बँक ऑफ इंडिया आणि यूनियन बँक ऑफ इंडिया
जर तुम्ही बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज घेत आहेत तर तेथे 30 वर्षांच्या काळासाठी कर्ज मिळते. आणि सुमारे 5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. तर युनियन बँक ऑफ इंडिया 30 वर्षांच्या कालावधीसाठी होम लोन देते. आणि ही बँक तुमच्या मालमत्तेच्या किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंतचे लोन देते. या दोन्ही बँकेचे गृहकर्जाचे व्याज वार्षिक 7.35 टक्क्यांपर्यंत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे होम लोन
बँक ऑफ महाराष्ट्र चा गृहकर्जाचा कालावधी 30 वर्षांपर्यंतचा असतो. या बँकेचे गृहकर्जाचे व्याज दर 7.10 टक्के वार्षिक पासून सुरु होते. जे केवळ चांगला CIBIL स्कोर असलेल्या ग्राहकाला मिळते. या बँकेत अनेक प्रकरणात प्रोसेसिंगची फि घेतली जात नाही. महिला ग्राहकांना आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना व्याजदरात 0.05 टक्के अतिरिक्स सुट देखील मिळू शकते. ज्यामुळे लोन अधिक स्वस्त होते.
यूनियन बँक ऑफ इंडिया
यूनियन बँक ऑफ इंडियाचे होम लोन 7.35 टक्के वार्षिक व्याज दरात उपलब्ध होते. आणि यास 30 वर्षांसाठी घेता येते. या लोनचा वापर घर खरेदी आणि घराचे रेनोव्हेशन किंवा दुरुस्ती करता येतो. बँक घराच्या किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. तसेच पंतप्रधान आवास योजनेलाही पाठींबा देते. ज्याचा वापर लोकांना स्वस्तात घर मिळण्यासाठी होतो.
