Share Buyback : वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदारांना लॉटरी, या कंपनीची बायबॅक ऑफर, 240 रुपयांनी खरेदी करणार प्रत्येक शेअर..

| Updated on: Dec 10, 2022 | 7:50 PM

Share Buyback : या कंपनीच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे..

Share Buyback : वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदारांना लॉटरी, या कंपनीची बायबॅक ऑफर, 240 रुपयांनी खरेदी करणार प्रत्येक शेअर..
जोरदार ऑफर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : बजाज समूहाची कंपनी बजाज कंझ्युमर केअरने (Bajaj Consumer Care) गुंतवणूकदारांसाठी मोठी ऑफर आणली आहे. परिणामी वर्षाच्या शेवटी त्यांना लॉटरी लागली आहे. शुक्रवारी या कंपनीने प्रत्येक शेअरसाठी 240 रुपये बायबॅक ऑफर
(Buyback Offer) जाहीर केली आहे. ही कंपनी एकूण 80.89 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करेल. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअर मार्केट रूटमधून बायबॅक करेल. 33.7 लाखांपर्यंत शेअर बायबॅक करेल. शुक्रवारी कंपनीच्या मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बोर्ड मीटिंगमध्ये याविषयीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

बजाज कंझ्युमर केअरचा शेअर शुक्रवारी BSE वर 3 टक्क्यांनी वधरला आणि 184.25 रुपयांवर पोहचला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर 179.65 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 30 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या खूश आहेत.

कंपनीचा शेअर 10 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 138.55 रुपये होता. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअरचा शेअर 9 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर 179.65 वर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 18 टक्क्यांची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

तर यंदा कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 207.45 रुपयांवर होता. तर 52 आठवड्यांच्या नीच्चांकी स्तरावर 129.25 रुपयांवर पोहचला होता. आता सध्या या शेअरची घौडदौड सुरु आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. अर्थात ही केवळ कंपनीच्या निर्णयाची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला बिलकूल नाही. बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत जरुर घ्या. तुम्हीही बाजाराविषयी अपडेट रहा. मगच गुंतवणूक करा.