Baba Vanga Prediction 2026 : सोने स्वस्त होणार? बाबा वेंगाची 2026 साठीची सर्वात मोठी भविष्यवाणी, सोने तब्बल…
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगा यांच्या जवळपास भविष्यवाणी खऱ्या होतात. 2026 मध्ये सोन्याचे भाव काय असणार याच्याबद्दल बाबा वेंगाने अत्यंत मोठी भविष्यवाणी दिली आहे.

नवीन वर्षाला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 2025 मध्ये सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याचे बघायला मिळाले. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव लाखांचा वर पोहोचला. सोने तब्बल 1 लाख 25 हजारांपर्यंत पोहोचले. बाबा वेंगा यांनी येणाऱ्या 2026 मधील सोन्याच्या भावाबद्दल मोठी भविष्यवाणी केली. विशेष म्हणजे ही भविष्यवाणी खरी ठरली तर सर्वांचे टेन्शन वाढेल. यामध्ये 2026 मध्ये सोन्याच्या भावाबद्दल मोठे भविष्य सांगण्यात आलंय. बाबा वेंगाला बाल्कनचे नोस्ट्रेडॅमस म्हणून ओळखले जाते. बाबा वेंगाच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 मध्ये जागतिक आर्थिक बदलांमुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते ज्याचा परिणाम पारंपारिक बँकिंग व्यवस्थेवर होऊ शकतो. या संकटामुळे बँकिंग संकट, चलन मूल्य कमकुवत होईल. या संकटाचा परिणाम थेट सोने आणि चांदीच्या भावावर होईल.
आर्थिक संकटामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. कारण जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होते. त्यामुळे, पुढील वर्षी सोन्याच्या किंमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज आहे. बाबा वेंगाचे हे भाकीत 2026 साठी आहे.
2026 मध्ये लोकांना अनेक विनाशकारी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागू शकते, अशीही मोठी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली. एआय वाढत्या प्रमाणात प्रबळ होईल, ज्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. बाबा वेंगा बल्गेरियातील एक रहस्यमय महिला होत्या. त्यांचे खरे नाव अँजेलिका पांडेवा गुशारोवा होते. अंध असल्या तरीही आश्चर्यकारक भविष्यवाणी त्यांनी जगासाठी केल्या आहेत.
विशेष म्हणजे बाबा वेंगाच्या आतापर्यंतच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या जवळपास भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. सध्या 1 लाख 25 हजारांच्या जवळपास सोन्याचा भाव आहे. त्यामध्येच आता अजून भाव वाढण्याचे दाट संकेत आहेत. 25 ते 40 टक्के सोन्याच्या भावात 2026 मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. 2026 मध्ये सोने खरेदी करण्याचे मोठे आव्हान नक्कीच असेल.
