Bank Holidays In 2021: पुढील 10 दिवसांपैकी 6 दिवस ‘या’ शहरांत बँका बंद राहणार, पटापट तपासा RBI च्या सुट्ट्यांची यादी

| Updated on: Aug 21, 2021 | 11:01 AM

Bank Holidays In August 2021: आरबीआय तिथल्या स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या यादीनुसार, ऑगस्ट 2021 साठी 15 सुट्ट्या देण्यात आल्या. यात दोन रविवार आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

Bank Holidays In 2021: पुढील 10 दिवसांपैकी 6 दिवस या शहरांत बँका बंद राहणार, पटापट तपासा RBI च्या सुट्ट्यांची यादी
Bank Holidays In August 2021
Follow us on

नवी दिल्ली : येत्या काळात जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. या महिन्यात येणाऱ्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहणार आहे. आरबीआय तिथल्या स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या यादीनुसार, ऑगस्ट 2021 साठी 15 सुट्ट्या देण्यात आल्या. यात दोन रविवार आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे.

बँका कधी आणि कुठे बंद होतील हे जाणून घ्या

येत्या काळात बँका कधी आणि कुठे बंद होतील याची माहिती जाणून घेऊयात. जेणेकरून वेगवेगळ्या शहरांमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (RBI Bank Holiday List) पाहून तुम्ही तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील याची माहिती घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करू शकता.

वीकेंड 22, 28 आणि 29 ऑगस्टला

जर आपण आगामी सुट्ट्यांबद्दल बोललो तर 28 ऑगस्ट हा महिन्याचा चौथा शनिवार आहे, ज्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय 29 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांमध्ये सुट्टी असेल.

‘या’ शहरांमध्ये बँका बंद राहतील

1) 22 ऑगस्ट 2021 – रविवार
2) 23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती (तिरुअनंतपुरम आणि कोची)
3) 28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार
4) 29 ऑगस्ट 2021 – रविवार
5) 30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)
6) 31 ऑगस्ट 2021 – श्रीकृष्ण अष्टमी (हैदराबाद)

HDFC  बँकेची आजपासून उद्यापर्यंत सेवा 18 तास बंद

जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी नक्कीच एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील, अशी माहिती बँकेनं दिलीय. बँकेने ही माहिती आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी बँक मेंटेनन्सचे काम करेल. एचडीएफसी बँकेने कळवले आहे की, या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत प्रभावित होतील. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्याच वेळी त्याला अपेक्षा आहे की, ग्राहक या कामात त्याला सहकार्य करतील.

संबंधित बातम्या

HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून उद्यापर्यंत बँकेच्या सेवा 18 तास बंद, जाणून घ्या

‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट, 28 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ

Bank Holidays In 2021: Banks will be closed in cities for 6 days out of next 10 days, check RBI’s holiday list